• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 August 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रायगडच्या समुद्रात बोट बुडाली

by Guhagar News
August 21, 2025
in Ratnagiri
143 1
0
The boat sank in the sea
281
SHARES
802
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण करंजा समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी  करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ, आणि नौदालाच्या गस्त नौकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. The boat sank in the sea.

बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर देखील बोलवण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाल्याचं सांगितलं जात आहे. बोटीत पाणी शिरल्याने ही बोट बुडाली. दरम्यान युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. बोट बुडाल्याची माहिती मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू केलं आहे. ही बोट कोणाची आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जिवीतहानी आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काही खुलासा झालेला नाही.  The boat sank in the sea.

वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात कशी आली याची माहिती समोर आलेली नाही. समुद्राला आलेलं उधाण पाहता मच्छिमारांनी काळजी घेणं गरजेचं आहे, सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. बचावकार्य तातडीनं होणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. ही बोट बुडाल्यानंतर काही जण बुडताना दिसत आहेत. ही बोट मच्छिमारांची आहे का? की कोणी दुसरे घेऊन जात होते? समुद्राला मागचे चार दिवस उधाण होतं हे माहिती असूनही बोट का गेली? याबाबत देखील सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही. The boat sank in the sea.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe boat sank in the seaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share112SendTweet70
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.