गुहागर, ता. 16 : मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर गुहागर समुद्रकिनारी संरक्षीत करण्यात आलेल्या अंड्डयांमधून ३३ कासव पिल्लांचा जन्म झाला असून नवजात कासवपिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. गुहागर समुद्रकिनारी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठया प्रमाणात कासव अंड्डयांचे संरक्षण केले जात आहेत. समुद्रकिनारी ६ कासव अंडी उबवीणी केंद्र उभारण्यात आली असून कासव संवर्धनासाठी ११ कासवमीत्रांची नेमणूक केली आहे.The baby turtles rushed towards the sea
गुहागर समुद्रकिनारी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठया प्रमाणात कासव अंड्डयांचे संरक्षण केले जात आहेत. समुद्रकिनारी ६ ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आली आहेत. कासवांची घरटी शोधून त्यातील अंडी संरक्षित करण्यासाठी ११ कासवमित्रांची नेमणूक केली आहे. हे कासव मित्र साडेसात किलोमीटर समुद्रकिनारी रोज गस्त घालत असतात. दक्षिण कोकण कांदळवन विभाग विभागीय वनअधिकारी कांचन पवार, रत्नागिरी कांदळवन वनपरीक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर, गुहागरचे वनपाल अमीत निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, कासवमीत्र संजय भोसले व त्यांची ११ कासवमित्रांची टीम कासव संवर्धनाचे काम करत आहे. पाऊस थांबल्यानंतर कासव वीणींचा हंगाम सुरू झाला. दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुहागर समुद्रकिनारी १२८ अंड्डयांचे पहिले घरटे मिळून आले होते. सदर अंडी तीन नंबरच्या कासव संवर्धन केंद्रामध्ये संरक्षित करण्यात आली होती. मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर बुधवारी (१४ जानेवारी) या घरट्यामधील १२८ अंड्यांपैकी ३३ अंड्यांमधील पिल्लांचा जन्म झाला. या पिलांना ऑलिव्ह रिडले कासवपील्लांना सुरक्षितपणे समुद्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया पार पडली. The baby turtles rushed towards the sea

यामुळे गुहागर समुद्रकिनारी कासव महोत्सवाला सुरूवात झाली आहे. नवजात कासपील्ले समुद्रामध्ये सोडताना वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता मंदार छत्रे, कासवमीत्र संजय भोसले, शार्दुल तोडणकर, साहिल तोडणकर तसेच पर्यटकही उपस्थित होते. The baby turtles rushed towards the sea
