सर्व मासे गुहागर – चिपळूण रस्त्यावर; क्लीनर किरकोळ जखमी
गुहागर, ता. 22 : गुहागर – चिपळूण मार्गावरील चिखली येथे सोमवारी दुपारी ४.०० च्या सुमारास मच्छी वाहतूक करणारा टेम्पो MH-43 BG 1171 अचानक रस्त्यावर उलटल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोचा क्लीनर किरकोळ जखमी झाला असून, टेम्पोमधील सर्व मासे रस्त्यावर विखुरले गेल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. Tempo transporting fish overturns
मिळालेल्या माहितीनुसार, हा टेम्पो अंजनवेलहून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी घेऊन जात होता. गुहागर चिखली परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर उलटला. अपघातानंतर टेम्पोतील सर्व मासे रस्त्यावर फेकले गेले व टेम्पोचेही मोठे नुकसान झाले. Tempo transporting fish overturns

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी क्लीनरला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. Tempo transporting fish overturns
