विद्यार्थी गुणगौरव समारंभ
गुहागर, 02 : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा बालक पालक शिक्षक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजून ३० मी. श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. Teachers’ Union’s Child Parent Teacher Gathering
तालुक्यातील शिक्षण चळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून १९९२ पासून अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गेले 32 वर्षे हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. यावर्षी हा समारंभ अंजनवेल केंद्राच्या केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री आर एच गळवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश शेंबेकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मोहन उकर्डे साहेब, राज्य संयुक्त चिटणीस प्रवीण काटकर, जिल्हाध्यक्ष अखिल रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे श्री दिलीप देवळेकर, जिल्हा सरचिटणीस श्री भालचंद्र घुले, ग्रामपंचायत पाठ पन्हाळे सरपंच माननीय श्री विजय तेलगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Teachers’ Union’s Child Parent Teacher Gathering

त्यावेळी प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नवोदय विद्यालय, गुणवत्ताधारक विद्यार्थी, माध्यमिक शाळां प्रमाणपत्र परीक्षा, इयत्ता दहावी सन 2024 – 25 मधील विद्यालयातील प्रथम प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, एकलव्य पुरस्कार विजेता विद्यार्थी, जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार विजेते शाळेतील शिक्षक, तालुक्यातील वर्षभरात सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक, नासा व इस्रोकरिता निवड झालेले विद्यार्थी या सर्वांचा रोख रक्कम, भेटवस्तू सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव केला जाणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ मनोज पाटील व सरचिटणीस प्रकाश जोगळे यांनी केले आहे. Teachers’ Union’s Child Parent Teacher Gathering