पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते चविका चहा टी स्टॉल उदघाट्न
गुहागर ता. 15 : रक्षितम अग्रोनिक्स ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपंनीकडून व चक्रभेदी सोशल फौंडेशनच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२५ पासून विधवा व एकल महिलांना रोजगाराची संधी म्हणून मोफत टी स्टॉल शॉप साठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे संस्थेकडे २० अर्ज आले त्यातील १७ लाभार्थांची निवड करण्यात आली. त्यातील प्राथमिक सात लाभार्थीना १२ जुलै २०२५ रोजी पालक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उदघाट्न करून रत्नागिरीतील, साळवी स्टॉप, बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे स्टॉलचे वाटप करण्यात आले. Tea stalls distributed to widows and single women


यावेळी प्रथम कपंनीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयादेवी अनुशिल मेढे व कपंनीचे अंतप्रेरक अनुशिल मेढे यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री मा. उदय सामंत यांचे स्वागत केले. नंतर फीत कापून उदघाट्न करण्यात आले. शीतल शंकर सावंत (चिपळूण ), दीपाली दिनकर गावडे (रत्नागिरी), रुचिता रविन्द्र सुर्वे (रत्नागिरी), पूजा अंकुश सुर्वे (चिपळूण ),दिपाली नरेंद्र विचारे (सावर्डा ), समीक्षा गुरुनाथ सावंत (रत्नागिरी ), संपदा प्रमोद सावंत (रत्नागिरी )हे लाभार्थी आहेत. रत्नागिरी जिल्हात दि. १६ व १७ जून २०२५ रोजी चिपळूण, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी या ठिकाणी कपंनीचे अनुशील मेढे व संस्थेच्या वैदेही सावंत, आश्लेषा इंगवले यांनी प्रत्यक्ष लाभार्थी व व्यावसायिक ठिकाणाची पाहणी केली होती. Tea stalls distributed to widows and single women
ज्या विधवा व एकल महिलांना टी स्टॉल हवे असतील त्यांनी संस्थेला अर्ज करण्याविषयी आवाहन
माजी नगरसेविका व शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शिल्पा प्रशांत सुर्वे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विधवा व एकल महिलांना रोजगाराची संधी देण्यासाठी मोफत टी स्टॉल देण्याची ही योजना अत्यंत स्तुत्य असून अनुशिल मेढे यांचा सेवाभाव घेण्यासारखा आहॆ तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी मला फोन केला व या योजनेविषयी माहिती दिली आणि मी एकल महिलांची तत्परतेने नावे दिली कारणं ही योजना महिलांना रोजगार देणारी आहॆ, असे मत व्यक्त केले. Tea stalls distributed to widows and single women
कपंनीचे अनुशिल मेढे म्हणाले की, आम्ही रत्नागिरीत लाभार्थी महिला व त्यांचे व्यावसायिक ठिकाण पाहणी करत असताना आम्हाला जागेची अडचण येणार नाही. सामंत साहेब भावाप्रमाणे आमच्या पाठीशी असल्याचे लाभार्थी महिलांनी सांगितले याची आठवण करून दिली. तसेच आपले सहकार्य लाभले तर आज २० लाभार्थी आहेत भविष्यात ५०० महिलांपर्यंत आशा स्वयं सिद्धा योजना देऊ असे मत व्यक्त केले. तसेच महिलांनी या माध्यमातून २५ ते ३० हजार कमवावेत, अशी अपेक्षित असल्याचे सांगितले. Tea stalls distributed to widows and single women


पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी आपले विचार मांडताना.. ही योजना अत्यंत चांगली असून महिलांना आर्थिक सक्षम करणारी आहॆ. रत्नागिरीत आमचे आपल्याला संपूर्ण सहकार्य असेल याची ग्वाही दिली. Tea stalls distributed to widows and single women
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिल्पा सुर्वे, सेवार्थ फौंडेशन, शशिकांत मोदी, परशुराम स्वयंरोजगार सहकारी संस्था, चक्रभेदी संस्थेचे सल्लागार. रावसाहेब चौगुले, आश्लेषा इंगवले,रागिणी यशवंतराव, प्रमोद पालवे यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन अभिजित गोडबोले यांनी केले. सुनील बेंडखळे यांनी संगमेश्वरी बोलीतील प्रहसन सादर करून मनोरंजन केले. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी समाधान व्यक्त केले आहॆ व अजून ज्या विधवा व एकल महिलांना टी स्टॉल हवे असतील त्यांनी संस्थेला अर्ज करण्याविषयी आवाहन केले आहॆ. Tea stalls distributed to widows and single women