रत्नागिरी, ता. 01 : कोकण रेल्वेच्या एका टीसीच्या सतर्कतेमुळे एका अपहरण होणाऱ्या मुलाला वाचवण्यात यश आलं आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर ते सावंतवाडी या ट्रेनमध्ये २७ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. त्याच्याकडे अधिक चौकशी करताच त्याने हे मूल मुंबई केइम रुग्णालयातून पळवून आणल्याचे स्पष्ट झाले. सदर मुलाचे नाव आयुष अजयकुमार हरिजन (वय-२) असल्याचे स्पष्ट झाले. या बाळाची आई रुग्णालयात उपचार घेत असताना आजीकडे असलेल्या या मुलाचे आरोपीने अपहरण केले होते. यानंतर आरोपीला भुईवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. TC saves a kidnapped baby
कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांना एक व्यक्ती एका लहान मुलाबरोबर आढळून आला. या व्यक्तीचं वागणं टीसीला खटकलं. त्या व्यक्तीची मुलासोबतची वागणूक वेगळीच होती. टीसी चव्हाण आणि अन्य प्रवाशांनाही हे वागणं खटकलं. संदेश चव्हाण यांना एका व्यक्तीचा संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीची चौकशी सुरू केली. पण त्याने उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. यामुळे चव्हाण यांना ते मूल त्याचे नसून त्याने पळवून आणले आहे हा संशय अधिक बळावला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संदेश चव्हाण यांनी त्या व्यक्तीला धरून ठेवलं. आणि तत्काळ चालत्या ट्रेन मधूनच नियंत्रण कक्ष वाडी बंदर लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे यांना माहिती दिली. TC saves a kidnapped baby

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक ताजने आणि ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांनी सदर संशयित इसम व त्याच्या कडील मुलाला ताब्यात घेतले. संशयित आरोपी अमोल अनंत उदलकर (वय-४२), राहणार इंदील देवगड याला मुलासह ताब्यात घेतले. TC saves a kidnapped baby
कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे या अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश आल्याने टीसी संदेश चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकण रेल्वेमध्ये आपली सेवा बजावताना दाखवलेल्या या सतर्कतेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तत्काळ दखल घेत संदेशचे विशेष कौतुक केले आहे. त्यांना पंधरा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे. संदेश चव्हाण यांना कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले आहे. TC saves a kidnapped baby