तवसाळ, विठ्ठल रखुमाई क्रीडा मंडळ आयोजित: चंडिका वरदान करदे संघ, उपविजेता
गुहागर, दि.14 : तालुक्यातील विठ्ठल रखुमाई क्रीडा मंडळ, तवसाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये चुरशीच्या सामना झाला. या अंतिम सामन्यात अर्श इलेव्हन तवसाळ संघ व चंडिका वरदान करदे संघाचा पराभव करत तवसाळ आगर स्पर्धेच्या विजेत्या पदावर आपले नाव कोरले. Tawasal Cricket Tournament


तवसाळ आगर मध्ये पहिल्यांदाच ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 7000/- व द्वितीय पारितोषिक 4000/-व आकर्षक चषक देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना आकर्षक चषक असे बक्षीस ठेवण्यात आले होते. अंतिम सामन्याचा निकाला नंतर अर्श इलेव्हन संघाचा अरबाज याला उत्कृष्ट फलंदाज व वधून याने अंतिम सामन्यात 3 विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले. Tawasal Cricket Tournament
स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेल्या चंडिका वरदान करदे संघाला नरवण मधील पोलीस दलात कार्यरत असलेले सुमंत जाधव यांच्या हस्ते रोख रक्कम व ट्राफि देऊन गौरविण्यात आले. व अर्श इलेव्हन विजेत्या संघाला तवसाळ आगर मधील डॉ. प्रशांत भाटकर यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. Tawasal Cricket Tournament

