गुहागर,ता. 20 : पडवे केंद्रस्तरीय हिवाळी क्रिडा स्पर्धा कुडली येथील आदर्श शाळा नंबर १ मध्ये उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे शाळा तवसाळ तांबडवाडीने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धा दि. १६ व १७ डिसेंबर २०२५ रोजी पार पडल्या. Tavasal Tambadwadi School’s success in sports competition

यामध्ये लहान गट खो-खो विजेता, लहान गट कबड्डी उपविजेता, लहान गट लंगडी उपविजेता, मोठा गट लंगडी उपविजेता, मोठा गट कबड्डी उपविजेता ठरले. तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात उंच उडी मोठा गट मुलगे हर्ष दिपक निवाते द्वितीय क्रमांक, लांब उडी मोठा गट मुले- हर्ष दिपक निवाते द्वितीय क्रमांक, उंच उडी लहान गट मुले – रुद्र मंगेश पारदळे द्वितीय क्रमांक, लांब उडी लहान गट मुले – रुद्र मंगेश पारदळे तृतीय क्रमांक,100 मीटर धावणे मोठा गट मुली सिद्धी दिपक येद्रे तृतीय क्रमांक विजेता ठरली. क्रिकेट स्पर्धेत हर्ष दिपक निवाते याने ३ चेंडू ३ षटकार सह 2 रनांची आतिषबाजी करून वैयक्तीक २० धावा केल्या. तवसाळ संघाला विजयी संपादन करत एकच जल्लोष केला. येणाऱ्या बालवयात उगवता सितारा तवसाळ तांबडवाडीचा असे संबोधले जाते. Tavasal Tambadwadi School’s success in sports competition

या हिवाळी क्रिडा स्पर्धेत विजेता व उपविजेता शाळेला चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले. याचे श्रेय मुख्याध्यापक श्री अंकुर मोहिते, श्री संदीप भोये, कु साई पुजाराआणि माता पालक ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांना आहे. तसेच पंचायत समिती गुहागर यांचा अभिनव असा मिशन लोकशाही प्रकल्प यामध्ये तालुकास्तरीय परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. Tavasal Tambadwadi School’s success in sports competition

