गुहागर, ता. 08 : गुहागर तालुकास्तरीय ५३ वा विज्ञान मेळावा पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल येथे ८ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आ. भास्कर जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. Taluka level science fair

या मेळाव्यात दि. ८ डिसेंबर सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत नोंदणी व प्रतिकृती मांडणी, दि. ९ रोजी सकाळी ८ ते १० विज्ञान दिंडी व शोभायात्रा, १० ते १२ उद्घाटन समारंभ, दुपारी १२ ते ५ पोस्टर स्पर्धा, व्याख्यान, प्रतिकृती परिक्षण व प्रदर्शन पाहण्यास खुले असणार आहे. दि. १० रोजी सकाळी ११ ते २ प्रश्नमंजुषा, २ ते २.३० पर्यंत आँनलाईन क्वीज स्पर्धा, दु. २.३० ते ५ बक्षिस वितरण समारंभ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Taluka level science fair
