गुहागर, ता. 16 : गुहागर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून सन 2024 तालुकास्तरीय खरीप पिक (भात व नागली) स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा भात लागवड व नागली लागवड या दोन गटात घेण्यात आली. भात लागवडीत अतुल हरिश्चंद्र अष्टेकर तर नागली पीक लागवडीत प्रभाकर रघुनाथ बागडे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. Taluka level Kharif crop competition


गुहागर तालुक्यातून नागली पीक स्पर्धेकरिता सात लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी चार लाभार्थ्यांनी पीक स्पर्धेतून माघार घेतली होती. या परीक्षेमध्ये भात लागवडीत अतुल हरिश्चंद्र अष्टेकर (वेळंब) यांचा प्रथम क्रमांक, गोपाळ गणेश झगडे (अडूर) द्वितीय क्रमांक तर प्रणव सुधीर काडदरे (शीर बुद्रुक) तृतीय प्राप्त केला. नागली पीक लागवडीत प्रथम क्रमांक प्रभाकर रघुनाथ पागडे (वाकी) तर पांडुरंग सोनु हळये (अडूर) यांनी व्दितीय प्राप्त केला. Taluka level Kharif crop competition