“शतसंवादिनी २.०”ची हाऊसफुलकडे वाटचाल
रत्नागिरी, ता. 09 : पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त ‘चैतन्यस्वर’ आणि ‘सहयोग रत्नागिरी’ २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता “शतसंवादिनी २.०” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्यावर्षी १०० हून अधिक वादकांच्या साथीने शतसंवादिनी कार्यक्रम रत्नागिरीत पार पडला. यावर्षी पुढील भागाचे म्हणजे “शतसंवादिनी २.०” कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यामध्येही १०० हून अधिक संवादिनी वादक आणि तालवाद्य साथीदार सहभागी होणार आहेत. Symphony of dramatic songs in Ratnagiri

कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून मोजकीच तिकिटे it’s my show या साईटवर तसेच नाट्यगृहावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाचे ऑनलाईन बुकिंग सुरु झाल्यापासूनच दोन दिवसांमध्येच रसिकांनी ऑनलाइन बुकिंग करून प्रयोग जवळपास हाउसफुल केला आहे. रसिकांनी याच कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग आयोजित करावा, अशी मागणी केली आहे. Symphony of dramatic songs in Ratnagiri
ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाची निर्मिती ज्येष्ठ संवादिनीवादक आणि संगीतकार अनंत जोशी यांच्या संकल्पनेतून झाली आहे. गतवर्षी विविध रागांच्या सिम्फनी सादर झाल्या होत्या. सुप्रसिद्ध नाट्यगीतांवर आधारित हार्मोनियम सिम्फनी सादर केली जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन अनंत जोशी यांचे असून यामध्ये रत्नागिरी मधील सर्व हार्मोनियम शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे करणार असून तबलासाथ आदित्य पानवलकर व प्रथमेश शहाणे, तसेच इतर तालवाद्याची साथ अद्वैत मोरे आणि राघव पटवर्धन यांची असेल. संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन एस कुमार साऊंड सर्व्हिसेच उदयराज सावंत आणि नेत्रदीपक रंगमंच व्यवस्था ओम साई डेकोरेटर्स अमरेश सावंत करणार आहे. उपलब्ध ऑनलाइन तिकीट विक्री इट्स माय शो डॉट इन या वेबसाईटवर चालू आहे. Symphony of dramatic songs in Ratnagiri