गुहागर, ता. 27 : तालुक्यातील रिगल कॉलेज, शृंगारतळी येथील तृतीय वर्ष हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रकल्पाअंतर्गत स्वर्ण सुंदरम थीम डिनर 2025 चे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व साऊथ इंडियन गेस्ट श्री. मितेश मोहन यांच्या हस्ते व्यंकटेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. Swarna Sundaram Theme Dinner at Shringartali
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नीता मालप (नगराध्यक्षा, नगरपंचायत, गुहागर), विजय तेलगडे (सरपंच पाटपन्हाळे), श्री.आसिम साल्हे (उपसरपंच, पाटपन्हाळे),श्री.सचिन सावंत (पोलिस निरीक्षक,गुहागर पोलिस स्टेशन), श्री.राजेश बेंडल (माजी नगराध्यक्ष,गुहागर), श्री. प्रदीप बेंडल (नगरसेवक नगरपंचायत, गुहागर), श्री.साहिल आरेकर (अध्यक्ष, आरेकर प्रतिष्ठान, गुहागर), श्री.गौरव वेल्हाळ(सामाजिक कार्यकर्ते, शृंगारतळी), श्री.सुधाकर कांबळे (मुख्याध्यापक, गुहागर हायस्कूल), श्री.साठे सर (मुख्याध्यापक, मुंढर हायस्कूल) उपस्थित होते. तसेच रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के , श्री.मंदार आवले (सीईओ, रिगल एज्युकेशन सोसायटी ), रिगल कॉलेज ,शृंगारतळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री.महेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते. Swarna Sundaram Theme Dinner at Shringartali
आपल्या प्रास्ताविकेमध्ये रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.मोरे यांनी रिगल कॉलेजमध्ये असलेल्या विविध कोर्सेस व विद्यार्थ्यांच्या नामांकित पंचतारांकित हॉटेल प्लेसमेंट बद्दल माहिती दिली. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वस्तू व आर्थिक रूपामध्ये मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये सौ.सुखदा पोतदार यांनी थीम डिनरच्या साऊथ थीम बद्दल माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा तसेच सोहम कदम या हॉटेल मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थ्याचा मॉरिशस येथे नामांकित हॉटेल मध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी स्टूडेंट ऑफ द इयर म्हणून तृतीय वर्ष हॉटेल मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थिनी इशिता मोरे हिला गौरवण्यात आले. Swarna Sundaram Theme Dinner at Shringartali
आपल्या मनोगतामध्ये श्री.राजेश बेंडल यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी रिगल कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ दिल्याबद्दल श्री.शिर्के यांना धन्यवाद दिले. थीम डिनरचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानामध्ये वाढ होत असल्यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे असे सांगितले. श्री.साहिल आरेकर यांनी गुहागरमध्ये थीम डिनरमुळे पर्यटनवाढीस चालना मिळेल असे सांगितले. सौ.नीता मालप यांनी रिगल कॉलेजच्या उत्कृष्ट मॅनेजमेंटचे कौतुक केले व अशा थीम डिनरच्या आयोजनामुळे भारतामधील विविध प्रांतातील खाद्यसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचते असे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.शिर्के सर यांनी दाक्षिणात्य संस्कृतीची माहिती दिली तसेच रिगलचे विद्यार्थी खूप मेहनती असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांची मेहनत असल्याचे सांगितले व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या व सर्व टीमचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.सुखदा पोतदार तसेच सूत्रसंचालन प्रा.सोनाली मिरगल यांनी केले. Swarna Sundaram Theme Dinner at Shringartali
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच थीम डिनरचा बुफे ओपन करण्यात आला. यादरम्यान लकी ड्रॉ च्या विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यामध्ये फोर बर्नर गॅस स्टोव, ड्रेसिंग टेबल, इंडक्शन, मिक्सर, इस्त्री व अन्य ६५ बक्षिसांचा समावेश होता. डिनरमध्ये साऊथ इंडियन व्हेज व नॉनव्हेज स्टार्टर व मेन कोर्सचा समावेश होता. यामध्ये आलूबोंडा, लेमन राईस, सांबार, पायसम आदि रुचकर डिशेसचा समावेश होता. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भरतनाट्यम, कोळी डान्स, लावणी, विविध सुमधुर गाणी तसेच फॅशन डिझायनिंग विभागामार्फत डिझाईन केलेल्या साऊथ इंडियन कॉस्ट्यूमच्या फॅशन शोचा समावेश होता. Swarna Sundaram Theme Dinner at Shringartali
अतिशय शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक असे या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले.या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी,प्राध्यापकवर्ग,सहकारी कर्मचारी तसेच सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे इव्हेंट इन्चार्ज म्हणून प्रा. श्री.विक्रम खैर तसेच स्टूडेंट इव्हेंट इन्चार्ज श्री.शुभम माळी म्हणून काम पाहिले. रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूणचे अध्यक्ष मा श्री संजयराव शिर्के ,संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Swarna Sundaram Theme Dinner at Shringartali
