चित्र, शिल्प प्रदर्शन आणि समूह गीत गायन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
गुहागर, ता. 26 : स्वरचैतन्य ग्रुप आबलोली (आंबेरे खुर्द) तालुका गुहागर यांच्या वतीने सलग पाचव्या वर्षी खोडदे सहाण येथे आयोजित दिवाळी पहाट बहारदार भक्ती गीतांनी सजली. स्थानिक वाद्यवृंद आणि गायकांच्या विविध गाण्यांच्या सादरीकरणाने आबलोली – खोडदे परिसरातील रसिकांना श्रवणीय फराळाची मेजवानी लुटता आली. या कार्यक्रमासोबत चित्र व शिल्प प्रदर्शन आणि समूह गीत गायन स्पर्धेस परिसरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Swarachaitanya Diwali dawn at Abaloli

दिवाळीचे औचित्य साधून स्वरचैतन्य ग्रुपच्या रंगत कलांची, संगत सुरांची हा कार्यक्रम गायक गितेश पांचाळ, संजना गांगण, कौशल पिलवलकर, गायत्री पांचाळ, सानवी पांचाळ, हार्मोनियम साथ, गिरीश पांचाळ, तबला साथ चेतन पांचाळ, पखवाज सूरज तीवरेकर, टाळ संदेश पांचाळ, प्रथमेश पांचाळ आदी कलावंतांनी सादर केला. वैष्णवी पांचाळ यांनी कविता वाचन केले. भक्ती-भाव गीतांची मेजवानी असलेली सूरमयी दिवाळी पहाट, तसेच अभिनव धामणस्कर व विश्वनाथ धामणस्कर यांच्या चित्र व शिल्प प्रदर्शनाचा लाभ परिसरातील रसिकांनी घेतला. यामध्ये विविध चित्रे, शिल्पे आदी कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. गुहागर तालुका मर्यादित समूहगीत गायन स्पर्धेत परिसरातील शाळांचे संघ सहभागी झाले होते. समूह गीत गायन स्पर्धेचे परीक्षण संदीप नाटूस्कर, संदेश हुमणे यांनी केले. Swarachaitanya Diwali dawn at Abaloli
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा पांचाळ यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणपत पांचाळ, वासुदेव पांचाळ, सदानंद पांचाळ, गौरव पांचाळ यांसह स्वरचैतन्याच्या सर्व सभासदांनी प्रयत्न केले. Swarachaitanya Diwali dawn at Abaloli
