गुहागर, दि. 03 : आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त परमपूज्य योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज 9 मार्च रोजी रत्नागिरीत येणार आहेत. 9 मार्च रोजी पहाटे 5 ते 7:30 या वेळेत परम पूज्य स्वामी रामदेव महाराज यांचे शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे योग प्राणायाम शिबिर होणार आहे. त्यानंतर स्वा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी, येथे सकाळी 9:30 ते 12:30 या वेळेत महिला मेळावा होणार आहे. Swami Ramdevji Maharaj in Ratnagiri


आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य साधून महिला पतंजली योग समिती पश्चिम महाराष्ट्रतर्फे 9 मार्च रोजी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मातृशक्ती संस्कारित असेल तर संपूर्ण राष्ट्र, समाज, कुटुंब संस्कारशील होते. भारताला पुन्हा वैभवशाली राष्ट्र बनवण्यासाठी तसेच पतंजली समितीचे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी मातृशक्तीचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे मातृशक्तीचा गौरव करण्याकरता आणि आपली भारतीय प्राचीन, सनातन, गौरवशाली वैदिक संस्कृतीच्या माध्यमातून नवराष्ट्र निर्माण करण्याकरता महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. यासंदर्भात रामदेव जी महाराज मार्गदर्शन करणार आहेत. Swami Ramdevji Maharaj in Ratnagiri


योगऋषी स्वामी रामदेव जी महाराज सुमारे दहा-बारा वर्षांच्या कालावधीनंतर रत्नागिरीमध्ये दाखल होणार आहेत. पतंजली योग समिती मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रत्नागिरीत गेल्या 18 वर्षांपासून पतंजली योग समितीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. Swami Ramdevji Maharaj in Ratnagiri
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वरिष्ठ राज्य प्रभारी सुधाताई, कोकण प्रांताच्या राज्य कार्यकारणी सदस्य रमाताई जोग, संवाद राज्य सभा प्रभारी अनिता जोशी, राज्य कार्यकारणी सदस्य मंगल वैद्य, अनुपमा कोरे, ज्योती जवाहिरे, आशा डोंगरे, हर्षदा डोंगरे, कल्पना ठोकल, मीना राजपूत यांनी केले आहे. Swami Ramdevji Maharaj in Ratnagiri

