गुहागर, ता. 08 : “अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ” या संस्थेचे अधिकृत परीक्षा केंद्र गुहागर मध्ये “सुविधा संगीत अकादमी” ला मिळाले आहे. त्यामुळे गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शास्त्रीय गायन, तबला, हार्मोनियम, कथक या सर्व विषयांच्या परीक्षा आता गुहागर मध्येच “कौटिल्य” येथे “सुविधा संगीत अकादमी” मध्ये होतील. Suvidha Sangeet Academy


सुविधा संगीत अकादमीच्या संचालिका सौ.सुविधा ओक स्वतः संगीत विशारद आहेत. त्या शास्त्रीय गायन आणि हार्मोनियमचे वर्ग घेतात. तसेच गुहागरमध्ये तबला आणि कथक नृत्य चे वर्ग घेतले जातात. गुहागर तालुक्यातील सर्व शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ही खूप मोठी सोय आहे. परीक्षा देण्यासाठी याआधी रत्नागिरी, चिपळूण किंवा दापोली येथील गांधर्व महाविद्यालयाच्या केंद्रांवर जावे लागत होते. म्हणून गुहागर येथे परीक्षा केंद्र व्हावे यासाठी श्री.महेश कुमार देशपांडे सर आणि सौ.सुविधा चिन्मय ओक. यांनी प्रयत्न केले. या परीक्षांचा फायदा बोर्डामध्ये मार्क मिळवण्यासाठी सुद्धा होतो. तसेच अनेक शाळांमध्ये सुद्धा संगीत विषय सुरु करत आहेत. या सर्वांची सोय व्हावी आणि शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून “सुविधा संगीत अकादमी” सदैव तत्पर राहिल. असे सुविधा संगीत अकादमीच्या संचालिका सौ.सुविधा ओक यांनी म्हटले आहे. Suvidha Sangeet Academy

