पिवळे व केशरी रेशन कार्ड, आधार कार्ड आवश्यक
गुहागर, ता. 13 : भ. क. ल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण तर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी दिनांक 13 ते 17 डिसेंबर 2025 रोजी वेळ स. 9.00 ते सा. 5.00 पर्यंत श्री सचिन धुमाळ 9272897834 यांचेकडे नाव नोंदणी करावयाची आहे. तसेच पिवळे व केशरी रेशन कार्ड, आधार कार्ड आवश्यक आहे. Surgery camp organized by Dervan Chiplun

शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, मुळव्याध, हायड्रोसिल, चरबीच्या गाठी, थायरॉईड, फिशर, मुतखडा, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट ग्रंथी, टॉन्सिल, कानाच्या पडद्याचे ऑपरेशन, नाकाचा हाड वाढणे शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हिप जॉइंट रिप्लेसमेंट (खुबा बदलणे), महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. Surgery camp organized by Dervan Chiplun
