गुहागर, ता. 09 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित संगीत आरती स्पर्धेत गुहागर तालुक्यातील खालचापाट येथील सुरभी आरती मंडळाने द्वितीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेत 15 आरती मंडळानी सहभाग घेतला होता. Surbhi Aarti Mandal 2nd in District Level Competition

या आरती मंडळात स्नेहा परचुरे, तनुजा भावे, स्मिता कानिटकर, दीपाली परचुरे, ज्योती परचुरे, मनवा सावरकर, विणा खरे, सई दामले यांचा सहभाग होता. त्यांना तबला साथ प्रकाश तांबे, ऑर्गन साथ चिन्मय सावरकर, चकवी, झाँज ऋषिकेश भावे यांनी साथ दिली. संगीत मार्गदर्शन अरुण परचुरे यांनी केले. या यशाबद्दल गुहागर तालुका ब्राह्मण संघ यांनी त्यांचा सन्मान केला. Surbhi Aarti Mandal 2nd in District Level Competition