गुहागर, ता. 22 : दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा” मानून आपल्या गावातील वाडी – वस्तीतील विद्यार्थी निधी संकलन करण्याकरिता आपल्याकडे आल्यास त्यांना आपला एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या प्रगतीला समजून स्वेच्छेने निधी देऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, अशी संस्थेमार्फत विनंती करण्यात आली आहे. Support students in fundraising
संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी संस्था दरवर्षी 3 डिसेंबर या “जागतिक अपंग सहाय्यता” दिनाच्या निमित्ताने निधी संकलन कार्डचे वाटप तालुक्यातील सर्व शाळांमधून केले जाते. यासाठी संस्थेने माननीय धर्मादाय आयुक्त रत्नागिरी, माननीय शिक्षणाधिकारी ( प्राथमिक व माध्यमिक) जि. प. रत्नागिरी व माननीय गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांची मान्यता घेतलेली आहे. सदरचे निधी संकलन तालुक्यातील शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. या जमा झालेल्या निधीतून सर्वांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक साहित्य वाटप, कृत्रिम साहित्य वाटप, विविध उद्योगाचे मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी तसेच इयत्ता चौथी, पाचवी व आठवी या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे मार्गदर्शन अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबविले जातात. तरी या दिव्यांगांनी दिव्यांगासाठी चालविलेल्या सेवाभावी संस्थेच्या उपक्रमांसाठी समाजातील लोकांनी सहकार्य करावे. Support students in fundraising

गुहागर तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी गेली 23 वर्ष सतत कार्यरत असणारी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था ही सेवाभावी संस्था असून संस्था धर्मादाय आयुक्त रत्नागिरी येथे 2002 मध्ये नोंदणीकृत संस्था असून संस्थेला दिव्यांग आयुक्तालय पुणे यांचे दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी तसेच गरीब होतकरू विद्यार्थी व समाजासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या संस्थेत 1400 हुन अधिक सर्व प्रकारचे दिव्यांग सभासद आहेत. या संस्थेची विशेष बाब म्हणजे सर्व कार्यकारी पदाधिकारी दिव्यांग असून दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. संस्थेला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान नाही, त्यामुळे संस्थेला कोणताही उपक्रम राबविताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संस्थेची स्वतःची अशी वरवेली चिरेखाण फाटा, तालुका गुहागर येथे जागा असून तेथे विविध उपक्रमांसाठी कार्यालय व छोटेखानी सभागृह आहे. Support students in fundraising