गुहागर, ता. 9 : तालुक्यातील आबलोली येथील कु. अनुज संदेश साळवी याची जागतिक मान्यताप्राप्त वर्ल्ड क्यूब असोसिएशन (The World Cube Association) मार्फत संयुक्त अरब अमिराती दुबई येथे 16 ते 17 डिसेंबर दरम्यान घेण्यात येणाऱ्या सनमार्क दुबई ओपन 2022 (Sunmark Dubai Open 2022) या स्पर्धेत (Sports) निवड झाली आहे. अनुप सध्या राजापूर नवोदय विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. या स्पर्धेत जगभरातील 28 देशांमधून 150 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
सनमार्क दुबई ओपन 2022 स्पर्धेत (sports) भारत, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान, इजिप्त, कॅनडा, सीरिया, युनायटेड किंगडम, तुर्के, रशिया, बहरीन, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, लेबनन, कोरिया, जपान, ओमन, इटली, फिनलँड, डेन्मार्क, इक्वेडोर इत्यादी देशांचा सहभाग आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर (Guhagar) तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी व संचालिका सौ. सावी साळवी यांचा सुपुत्र अनुज साळवी याची निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Sunmark Dubai Open 2022
यापूर्वी अनुज साळवी याने जागतिक दर्जाच्या क्यूब स्पर्धेत मध्ये मुंबई येथे घेण्यात आलेल्या फिनिक्स क्यूब चॅलेंज 2022, केरळ येथील एमक्यूब ओपन 2022 आणि पुणे येथील घेण्यात आलेल्या आयआयएसईआर पुणे क्यूब ओपन 2022 या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून उज्वल यश संपादन केले आहे.