गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथील रहिवासी व दैनिक प्रहारचे गुहागर तालुका प्रतिनिधी आशिष कारेकर यांच्या मातोश्री कै. सुजाता सुरेश कारेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या 69 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी सोमवारी दुपारी 2 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तळवली परिसरात शोककळा पसरली आहे. Sujata Karekar is No More

कै. सुजाता कारेकर यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ व प्रेमळ होता. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. मुंबई येथे उपचार करून त्यांना आपल्या तळवली येथील राहत्या घरी आणले असता सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. तळवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि.10 रोजी तळवली स्मशानभूमी येथे तर बारावे विधी शुक्रवार दि.12 व उत्तरकार्य शनिवार दि.13 रोजी तळवली येथील राहत्या घरी पार पडणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. Sujata Karekar is No More