गुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी पालपेणे रस्त्यावरील दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या रहात्या घरात त्यांचा भाचा प्रशांत मारुती कदम (वय 27) याने आज गळफास लावून आत्महत्या केली. गेले काही दिवस मानसिक तणावाखाली (Mental Stress) असल्याने त्यांने आत्महत्या (Suiside) केली असावी. असा अंदाज फीर्यादी दत्ता घाडी यांनी आपल्या जबाबात वर्तवला आहे. Suicide of young man

Suicide of young man
प्रशांत मारुती कदम याचे मुळगाव कनार्टक राज्यातील काटगाळी, ता. खालापूर, जि. बेळगांव हे आहे. गेली 10 वर्ष तो आपल्या मामाकडे दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या शृंगारतळी पालपेणे रस्त्यावरील घरी रहातो. दत्ता घाडी यांनी प्रशांतला आपल्या घरामधील वरच्या मजल्यावर रहाण्यासाठी खोली दिली आहे. बांधकाम कामगार म्हणून काम करतो. सोमवारी (ता. 19) सकाळी नेहमीप्रमाणे तो शृंगारतळी येथील बेलवलकर यांच्या दुकानाचे काम करण्यासाठी गेला. मात्र सकाळी 10 च्या दरम्यान डोके दुखत असल्याचे सहकारी उम्मीद सींग याला सांगून तो कामावरुन घरी येवून आपल्या खोलीत गेला. दुपारी जेवणाची वेळ झाली म्हणून दत्ता घाडी त्याला बोलावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. त्यावेळी प्रशांत कदमच्या खोलीला समोरच्या व मागच्या दरवाजाला आतून कडी असल्याचे असल्याचे त्यांचा लक्षात आले. हाका मारुनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी प्रशांतच्या मोबाईलवर कॉल लावला. पण हा कॉलही उचलला गेला नाही. अखेर दत्ता घाडी यांनी हॉलच्या खिडकीची काच फोडून हॉलचे निरीक्षण केले. परंतु तेथे प्रशांत दिसला नाही. म्हणून दत्ता घाडी यांनी त्यांच्याकडेच कामाला असणाऱ्या बबलु रॉयला मागील दरवाज्याजवळची खिडकीची काच फोडण्यास सांगितले. त्यावेळी प्रशांत कदमने गळफास लावून घेतल्याचे कळले. तातडीने दत्ता घाडी यांनी हॉलच्या खिडकीतून हात घालून दरवाज्याची कडी उघडून खोलीत प्रवेश केला. प्रशांतची पहाणी केली तेव्हा तो मृत असल्याचे लक्षात आले. प्रशांत कदमने सोमवारी (ता. 19) दुपारी 11 ते 2 च्या दरम्यान छताच्या लोखंडी पाईपला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. Suicide of young man

याबाबतची खबर देताना दत्ता घाडी यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, गेली दोन वर्ष प्रशांतचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला (Mental Stress) होता. त्यातच प्रशांतच्या मुळगावी रहाणारा मोठा भाऊ गेले 7 दिवस बेपत्ता आहे. या दोन्ही गोष्टीमुळे मानसिक तणावामध्ये त्याने आत्महत्या केली असावी. या प्रकरणाचा अधिक तपास लुकमान तडवी व कुमार घोसाळकर करीत आहेत. Suicide of young man
