गुहागर, ता. 19 : गुहागर – चिपळूण मार्गावरील ओमकार मंगल कार्यालय चिखली येथे कामाला असणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. तो चिखली येथील मंगल कार्यालयात अडीच वर्षापूर्वी कामाला लागला होता. स्वप्नील हा विवाहित असुन त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आहे. Suicide of a youth in Chikhali

ओमकार मंगल कार्यालय येथे कामाला असणाऱ्या स्वप्नील गोपाळ कानसे ( वय 32 कानसे वाडी चिखली) या व्यक्तीने नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजताच्या सुमारास सर्व कामगारांना चहा दिला आणि ९ वाजता तेथील एका खोलीत गळफास लावल्याच्या स्थिती आढळला. त्याचा मृतदेह चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. Suicide of a youth in Chikhali