गुहागर, ता. 09 : मानसिक आजाराला कंटाळून एका विवाहितने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. सौ. अनुश्री संतोष चव्हाण, (वय 40) रा. मढाळ चव्हाणवाडी असे या विवाहितचे नाव आहे. या घटनेबाबत मनोज बाळकृष्ण चव्हाण यांनी गुहागर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार सौ. अनुश्री चव्हाणला मानसिक आजार होता. त्या आजारावर औषधोपचारही सुरु होते. शनिवार, दि. 9 जुलै 2022 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास घरामधील बेडरुमच्या सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावून तिने आत्महत्या Suicide केली. आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुहागर पोलीसांनी आकस्मिक मृत्यू Suicide म्हणून नोंद केली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नलावडे करत आहेत.