परिस्थितीवर मात करत प्रणय वेद्रेने पूर्ण केले शासकीय सेवेचे स्वप्न
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील पालकोट गावचा सुपुत्र प्रणय रघुनाथ वेद्रे यांची गुहागर नगरपंचायतीमध्ये नगर रचना सहाय्यक ( नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग वर्ग 2) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सरळ सेवामधुन शासकीय सेवेत आलो असून आपल्याच तालुक्यात पहिल्यांदा काम करायला मिळणार याचा आनंद झाला आहे. अशी प्रतिक्रिया प्रणय वेद्रे यांनी व्यक्त केली आहे. गुरुपौर्णिमेपासून (10 जूलै) ते गुहागर नगरपंचायतीमध्ये कार्यरत होणार आहेत. SUCCESS SOTRY OF PRANAY VEDRE


पालकोटमधील शेतकरी रघुनाथ वेद्रे यांचे चरितार्थाचे साधन केवळ शेती आहे. अशा घरातील प्रणय वेद्रे यांचे प्राथमिक शिक्षण (सातवीपर्यंत) जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. अभ्यासात हुशार असलेला प्रणयने ८ वी ता 10 वीचे शिक्षण वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे येथे केले. 10 वीमध्ये 92 टक्के मार्क मिळवून तो वरदान हायस्कूलमध्ये पहिला आला. या गुणांच्या आधारावर मुंबईतील सोमैय्या पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. 2019 मध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडमध्ये मेरिटवर प्रवेश मिळवला. 2022 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यावर पुन्हा प्रणय मुंबईत आला. त्यांनी जूलै 2022 ते मे 2024 या काळात स्ट्रक्चरल इंजिनियरींगमध्ये नोकरी करत होते. मात्र शासकीय सेवेत जाण्याची इच्छा होती. ऑगस्ट 2024 मध्ये नगर रचना सहाय्यक या सरळ सेवेत भरती असल्याची जाहीरात प्रसिध्द झाली. ही जाहीरात वाचल्यावर प्रणयने नोकरी सोडली आणि पुन्हा अभ्यास करण्यासाठी कराडला आला. आपल्याच कॉलेजच्या ग्रंथालयात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. SUCCESS SOTRY OF PRANAY VEDRE


जानेवारी 2025 मध्ये स्पर्धा परिक्षा झाली. त्याचा निकाल मार्च 2025 मध्ये जाहीर झाला. स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि पोलीसांकडून व्हेरिफिकेशन असे दोन टप्पे पूर्ण झाले. 1 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाकडून इ मेल द्वारे गुहागर नगरपंचायतीमध्ये नगर रचना सहाय्यक म्हणून नियुक्ती केली असल्याचे कळविण्यात आले. SUCCESS SOTRY OF PRANAY VEDRE


हा सर्व प्रवास प्रणय वेद्रे आणि त्याच्या कुटुंबियांसाठी खडतर होता. दोन बहिणी आणि प्रणय मुंबईत भाड्याची खोली घेवून रहात होते. शिक्षणाचा खर्च नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून पैसे घेवून प्रणयने केला होता. या खडतर प्रवासात प्रणयच्या बुध्दीवर, मेहनतीवर, जिद्दीवर विश्र्वास ठेवून ज्यांनी शिक्षणासाठी त्याला साह्य केले त्यासर्वांमुळे आज आम्ही हा आनंद साजरा करु शकत आहोत. अशी भावनिक प्रतिक्रिया प्रणयचे वडील रघुनाथ वेद्रे यांनी व्यक्त केली. SUCCESS SOTRY OF PRANAY VEDRE
घरच्या परिस्थितीमुळे सरळ सेवेतून शासकीय सेवेत आलो असलो तरी मी एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. – प्रणय वेद्रे