• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेतच्या नेहा जोगळेकर यांची गगनभरारी

by Guhagar News
July 29, 2025
in Guhagar
925 9
0
Success of Neha Joglekar
1.8k
SHARES
5.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव शिक्षिका नेहा मनोज जोगळेकर यांची सन 2025 मध्ये इस्रो…. गोवा, मुंबई, बंगलोर, केरळ या भारतीय अंतराळ संशोधन केंद्राला तर नासा… अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्राला अभ्यास भेट देण्यासाठी निवड झाली आहे. पालकवर्ग, शिक्षक वर्ग, समाजसेवी संस्था, अधिकारी वर्ग या सर्वाकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Success of Neha Joglekar

जि. प. रत्नागिरी यांचा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम…’जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान’ अर्थात मिशन गगनभरारी या उपक्रमांतर्गत आत्तापर्यन्त विविध पुरस्कारांनी सन्मानीत झालेल्या गुहागर तालुक्यातील कोळवली गावच्या कै. वसंत व श्रीम. सुषमा सावरकर यांच्या सुकन्या व पालशेत गावच्या सूनबाई सौ. नेहा मनोज जोगळेकर यांची अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्राला अभ्यास भेट देण्यासाठी निवड झाली आहे. Success of Neha Joglekar

मार्च 2025 मध्ये त्या इस्रो दौरा करून आल्या. आत्ता दि. 30 जुलै ते 13 ऑगस्ट या काळात त्या नासा, अमेरिका  दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. जि. प. रत्नागिरी यांच्याकडून 4 टप्यात इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांची विज्ञान विषयावर… विज्ञान, अंतराळ संशोधन केंद्र व त्यांचे कार्य, अंतराळयात्री, रॉकेट्स इ. विषयावर परीक्षा घेतली जाते. प्रत्येक तालुक्यातील 5 विदयार्थी निवडले जातात. पैकी इ. 7 वी चे पहिले येणारे दोन विदयार्थी नासा व इस्रो तर उर्वरित फक्त इस्रोला जातात. जिल्ह्याला रेकॉर्ड ब्रेक विशेष अभिनंदनीय गोष्ट अशी, की तालुक्यातून निवडल्या गेलेल्या 6 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी सौ. नेहा मॅडमचे अर्थात गुहागर नं. 1 शाळेचे आहेत. जिल्ह्यात पहिला आलेला विद्यार्थीही नेहा मॅडमचा अर्थात गुहागर नं. 1 शाळेचा कु. सोहम समीर बावधनकर हा आहे.  Success of Neha Joglekar

आतापर्यंतच्या 34 वर्षांच्या नोकरीत प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यासाठी त्यांना जि. प. चा अतिशय मानाचा समजला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. विविध संस्थानी उपक्रमशील शिक्षिका, सेवाव्रती शिक्षिका, आदर्श शिक्षिका अशा पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे. उत्कृष्ट पत्रलेखनाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. प्रशासनानेही त्यांच्या वेगळ्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या कामाची दखल घेऊन वेळोवेळी उकृष्ट अहवालाने सन्मानीत केले आहे. नुकत्याच मे 2025 मध्ये त्यांनी मान. शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, शिक्षण सचिव, सहसचिव, शिक्षण आयुक्त, दक्षिण विभागातील 10 जिल्हे, त्यांचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांना ‘गुणवत्ता विकास’ या मधील भरीव कार्याची PPT सादर करून रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. Success of Neha Joglekar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSuccess of Neha Joglekarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share726SendTweet454
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.