खो-खो स्पर्धेत मुलींचा संघ गुहागर तालुक्यात प्रथम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या आणि गुहागर तालुक्यातील देवघर येथे संपन्न झालेल्या पावसाळी खो-खो क्रीडा स्पर्धेत गुहागर तालुक्यातील कोळवली येथील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली संचलित, माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. Success of Kolvali School in Rainy Sports Competition

अंतिम सामन्यापर्यंत अटीतटीच्या आणि रंगतदार ठरलेल्या सामन्यात कोळवली हायस्कूलच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये पालपेणे हायस्कूलच्या मुलींच्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. याबद्दल ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम वाघे, उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, सचिव नारायण मोहिते, खजिनदार वासुदेव डिंगणकर, शंकर जोशी यांचेसह तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मुख्याध्यापक विजय पिसाळ यांनी विजयी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक बाळासाहेब लवटे, कर्मचारी विकास कदम या सर्वांचे अभिनंदन करून जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. Success of Kolvali School in Rainy Sports Competition