स्वराजराजे रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, तर राशिनकर सर तृतीय
गुहागर, ता. 18 : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक शिवशंभू लेखी परीक्षा घेण्यात आली होती. रायगड विश्वविद्यालय, आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समितीने आयोजित केली होती. या राज्यस्तरीय ऐतिहासिक शिवशंभू लेखी परीक्षा २०२१ चा प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान शिवशंभूप्रेमी, शिवव्याख्याता स्वराजराजे बाबासाहेब राशिनकर या ९ वर्षाच्या विद्यार्थ्यांस मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत त्याने १८ वा क्रमांक पटकावला आहे. तर त्याचे वडील शिवशंभूप्रेमी बाबासाहेब राशिनकर सर यांनी याच शिवशंभू ऐतिहासिक लेखी परिक्षेत खुल्या गटात रत्नागिरी जिल्ह्यात तृतीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. Success in Shivshambhu test

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे गड किल्ले या विषयावर आधारित असलेल्या व महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या राज्यस्तरीय ऐतिहासिक शिवशंभू लेखी परीक्षेत राशिनकर पितापुत्रांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Success in Shivshambhu test
