गुहागर, ता. 17 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचालित रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या TYBCA मधील कु. इकरा जांभारकर व कु.तमसिल सरनोबत या विद्यार्थिनींनी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल आयोजित ‘Spark on Tech Fest 2026’ या आंतरमहाविद्यालयीन प्रोजेक्ट प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या विद्यार्थिनींनी Full Stack Java व Machine Learning चा वापर करून ‘CAREERLY’ हा सामान्य विद्यार्थ्यांना करिअर साठी मार्गदर्शन करणारे ऑनलाईन सॉफ्टवेअर बनविले होते. Success in Regal College Project Presentation Competition

या फेस्टमध्ये असलेल्या विविध मॉड्यूलसाठी विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. logo designing या स्पर्धेमध्ये SYBCA च्या कु. हिमानी खातू व कु. कशिश मोहिते या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना BCA विभागाच्या विभागप्रमुख प्रा.सोनल पाटील तसेच प्रा.श्वेतांजली डेरवणकर, प्रा.अल्तफा तवसाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. Success in Regal College Project Presentation Competition

सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थिनींचे रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के,संचालक मा.श्री.अनिश शिर्के व रिगल कॉलेज,शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे व सर्व प्राध्यापक वर्गाने अभिनंदन केले. रिगल कॉलेज, शृंगारतळीमध्ये मुलगे व मुली या दोन्हींसाठी उपलब्ध असलेल्या BCA(Bachelor of computer application) या कोर्सची शैक्षणिक वर्ष 2026-27 ची प्रवेश प्रक्रिया रिगल कॉलेज शृंगारतळी येथे सुरू आहे. AICTE अंतर्गत येणाऱ्या या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी MHT BCA-CET ही परीक्षा देणे बंधनकारक आहे. १२ वी उत्तीर्ण सर्व शाखांमधील मुलगे व मुली या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. तरी जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. मोरे यांनी केले आहे. Success in Regal College Project Presentation Competition
