शिफा मालदोलकर आर्ट्स तर अक्सा मुल्लाजी कॉमर्स शाखेत तालुक्यात प्रथम
गुहागर, ता.17 : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये शृंगारतळी येथील युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. आर्ट्स व कॉमर्स शाखेत यंदाही उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. आर्ट्स शाखेमध्ये शिफा मालदोलकर हिने ८०% गुण मिळवून तर अक्सा मुल्लाजी या विद्यार्थिनीने कॉमर्स शाखेत ८६% गुण मिळवून तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. Success in H.S.C Exam

या यशाबद्दल फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे संस्थापक शब्बीर बोट यांच्या हस्ते अक्सा मुल्लाजी हिचा सत्कार करण्यात आला. तर फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव तसेच युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक प्रा. जहूर बोट यांच्या हस्ते शिफा मालदोलकर या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षिका पल्लवी शेट्ये यांनी अभिनंदन केले. Success in H.S.C Exam

संस्थेचे अध्यक्ष शब्बीर बोट यांनी विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. Success in H.S.C Exam
