संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बालभारती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनींनी गुहागर तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पोलीस ठाणे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला. Students of Balbharti School performed Raksha Bandhan

या रक्षाबंधन सोहळ्यासाठी आपले रक्षण करणारे पोलीस ठाणे गुहागर येथील पोलीस निरीक्षक सचिन सावंत साहेब व सर्व कर्मचारी, गुहागरचे कार्यतत्पर तहसीलदार मा. परीक्षित पाटील साहेब तसेच विद्यार्थ्यांसोबत शाळेचे प्राचार्य सुरजित चटर्जी, शाळेचे शिक्षक राहुल हेगीष्टे सर, सौं. जान्हवी आर्यमाने मॅडम आदी उपस्थित होते. Students of Balbharti School performed Raksha Bandhan
