गुहागर, ता. 28 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुटगिरी नं. १, आबलोली शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे आजीबाईचा बटवा या हस्तलिखिताचे केंद्रप्रमुख अशोक गावणकर यांचे हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत केक कापुन अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. Student Meet at Kutagiri School

यावेळी गावातील महिलांची रंगावली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्त कौशल्य साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. रात्री शालेय विद्यार्थ्याचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. Student Meet at Kutagiri School

या कार्यक्रमाला उपस्थित माजी विद्यार्थी यांनी शाळेला आवश्यक वस्तू व भरघोस आर्थिक मदत केली. यापुढेही शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील माजी शिक्षक श्री. मुंडणके, श्री.पवार, श्री.चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सोहनी व त्यांचे सहकारी शिक्षक यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. Student Meet at Kutagiri School

या कार्यक्रमाला केंद्र प्रमुख श्री. अशोक गावणकर, सरपंच श्री. समीर डिंगणकर, पोलीस पाटिल श्री. सुधाकर खेतले, उपसरपंच श्री.विजय कदम, श्री. राजेश सोहनी, श्री.दिनेश हुमणे, डॉ. विजय वीर, प्रकाश वीर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष खेतले, संदीप सोहनी मुख्याध्यापिका श्रीम. ऋतुजा सोहनी, श्रीम. स्नेहा निर्मळ, श्रीम. शामल पवार, श्री. मारुती फटकरे आदी उपस्थित होते. Student Meet at Kutagiri School

