उमरोली येथील घटना, मार्गताम्हाने कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र शाखेची विद्यार्थ्यांनी
गुहागर, ता. 15: परीक्षेचा पेपर देऊन घरी येऊन झोपलेल्या १६
वर्षीय विद्यार्थीनीचा सर्पदंशाने दुदैवी मृत्यू झाला. ही घटना चिपळूण तालुक्यातील उमरोली येथे गुरुवारी (ता.13) दुपारच्या सुमारास घडली. कु. सिध्दी रमेश चव्हाण असे तीचे नाव आहे. Student dies of snakebite
चिपळूण तालुक्यातील मूळचे दुर्गवाडी येथील रमेश शांताराम चव्हाण यांचा उमरोली चिवेली फाटा येथे पूर्वीपासून हार फुलांचा व्यवसाय आहे. हे कुटुंब उमरोली (घोणसरे) येथील एका चाळीत राहतात. त्यांची मुलगी कु. सिध्दी ही मार्गताम्हाने येथील कै. सौ. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालयात सायन्स शाखेत इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत होती. Student dies of snakebite
गुरुवार दि. १३ आँक्टोबरला तिचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होता. तो पेपर देऊन दुपारी १ वाजता सिध्दी आपल्या घरी आली आणि दुपारी झोपी गेली होती. या दरम्यान, घरामध्ये उंदराच्या मागावर आलेल्या सापाने या मुलीला दंश केला आणि निघून
गेला.Student dies of snakebite
झोपेत असलेल्या सिध्दीला लगेच कळले नाही. तिने उठून पाहिले असता शेजारी उंदीर दिसला व या उंदरानेच आपल्याला दंश केला असावा, असा तिने अंदाज केला. या सर्व अंदाजाच्या धावपळीत बराच वेळ निघून गेला होता. विष संपूर्ण रक्तात भिनले होते. जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्यापूर्वीच ती बेशुध्द होऊन तिचा मृत्यू झाला. यानंतर कामथे येथे मृतदेह आणण्यात येऊन मध्यरात्री शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. Student dies of snakebite
