रत्नागिरी, ता. 29 : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रत्नागिरी बसस्थानक परिसरात स्वयंसेवकांनी प्रभावी पथनाट्य सादर करून प्रवाशांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. Street play of Dev, Ghaisas, Kir College

राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. मिथिला वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व आणि तरुणांची भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरी बसस्थानकसारख्या गजबजलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अभिनयातून मतदानाची प्रक्रिया, मतदानाचे अधिकार आणि प्रलोभनांना बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयामध्येही या दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. स्मार्था कीर यांनी उपस्थित सर्वांना ‘मतदार प्रतिज्ञा’ दिली. “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू…” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपला लोकशाही अधिकार बजावण्याची शपथ घेतली. Street play of Dev, Ghaisas, Kir College

यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, विज्ञान विभाग प्रमुख वैभव घाणेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. मिथिला वाडेकर आणि इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्या पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या जनजागृती मोहिमेत ‘एन.एस.एस.’च्या स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन “मतदान आमचा हक्क आहे” असा संदेश समाजात पोहोचवला. Street play of Dev, Ghaisas, Kir College
