आबलोली ग्रामपंचायतकडे व्यापारी आणि शेतकऱ्यांची मागणी
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली बाजार व रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी व मोकाट गुरांनी हैदोस घातला असून शेतीसह व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यांना वेळीच आवर घालावा, अशी मागणी व्यापारी आणि शेतकऱ्यांची आबलोली ग्रामपंचायतकडे केली आहे. Stray dogs and cattle should be provided for

आबलोली हे आजू बाजूच्या जवळ जवळ २५ ते ३० गावांचे बाजार रहाटाचे केंद्र आहे. येथे अनेकजण बाजारासाठी व औषधोपचारासाठी येत असतात. परंतू रस्त्यावर बसलेल्या उनाड गुरांमुळे दुचाकीस्वार जखमी झाले (Accident due to Stray Cattle) आहेत. तरी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी पुढाकार घेऊन भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी व्यापारी, शेतकरी व सुज्ञ नागरीक यांचे कडून करण्यात येत आहे. Stray dogs and cattle should be provided for
