गुहागर तालुक्यातील कोळीवाड्यात आनंदाचे वातावरण
गुहागर, 31 : मोंथा वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील 7 बोटींशी संपर्क तुटला होता. यामध्ये गुहागर तालुक्यातील दोन बोटी आणि सुमारे 30-40 खलाशी असल्यामुळे गुहागर तालुक्यासह करंजा, मढ, न्हावाशेवा, वर्सोवा बंदरात गेले तीन दिवस चिंतेचे वातावरण होते. तटरक्षक दल, नाविक दल, बंदर विभाग, सागरी सीमा मंच, सोसायट्यांचे पदाधिकारी आदींकडून सतत प्रयत्न सुरु होते. आज सकाळी चार बोटींशी संपर्क झाला. या बोटींवर काम करणारे खलाशी सुखरुप असल्याचे कळले आणि कोळीवाड्यातील चिंता दूर झाली. बेपत्ता बोटींशी संपर्क साधण्यासाठी तटरक्षक दल, नौदल, बंदर विभाग, सागरी सीमा मंच, सोसायट्यांचे पदाधिकारी यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु होते. Stranded boats and fishermen safe

गेले दोन दिवस अरबी समुद्रात मोंथा चक्री वादळामुळे गंभीर स्थिती आहे. अजुन दोन दिवस हे वादळ रहाणार आहे. वादळ येणाऱ्यापूर्वी 25 ऑक्टोबरच्या दरम्यान वर्सोवा, मढ, न्हावाशेवा, करंजा या मोठ्या बंदरांसह कोकण किनारपट्टीवरील सुमारे 20 ते 30 मच्छीमार नौका खोल समुद्रात मासेमारीला गेल्या होत्या. संबंधित नौकांना वादळाचा इशारा मिळाल्यावर सुरक्षित बंदरात जाण्यासाठी या नौका निघाल्या मात्र 7 बोटींना परतीच्या प्रवासात वादळाने घेरले. 26 ऑक्टोबरला या नौकांशी संपर्क तुटल्यानंतर बंदर विभाग, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरुन कळविण्यात आले. सागरी सीमा मंचचे कार्यकर्ते, करंजा सोसायटीमधील पदाधिकारी यांनी तटरक्षक दल, नौदल, मत्स्य विभागाचे मंत्री नितेश राणे, सहाय्यक आयुक्त देवरे यांच्याशी संपर्क साधुन पाठपुरावा सुरु केला. Stranded boats and fishermen safe

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी देखील शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणांकडे पाठपुरावा करत होते. दरम्यान 29 तारखेला रात्री एका बोटीवर संपर्क साधण्यात तटरक्षक दलाला यश आले. मात्र 6 बोटींशी संपर्क होत नव्हता. नेमक्या याच बोटींवर गुहागर तालुक्यातील खलाशी होते. त्यामुळे साखरी आगर, धोपावे, वेलदूर, नवानगर येथील कोळीवाड्यातून चिंतेचे वातावरण होते.
