धोपावेतील महिलांचा शासनासमोर आक्रोश, दारुबंदीची मागणी
गुहागर, ता. 08 : गावातील मोठेच लहानांना थंडपेयातून दारु देतात. नववी दहावीतील मुले दारुच्या मोठ्यांप्रमाणे पार्टी करतात. एका दुकानाबाबत तक्रार केली की दुसरा धंदा सुरु होतो. हे थांबले नाही तर अख्खा गाव बर्बाद होईल. असा आक्रोश धोपावे मच्छीमार समाजातील महिलांनी तहसीदार आणि पोलीस प्रशासनासमोर केला. पाया पडतो पण गावात संपूर्ण दारुबंदी करा. अशी मागणी या महिलांनी केली आहे. Stop illegal drug trade

गुहागर तालुक्यातील धोपावे गावात मच्छीमार समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजातील पुरुष मंडळीचा दारुबंदीला विरोध आहे. घरातील महिलांनी दारुबंदीचा विषय काढला तर पुरुष मंडळी हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. तरी देखील 10-11 महिलांनी हा दबाव जुगारुन गुहागर गाठले. गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे आणि पोलीस अधिकारी यांना धोपावेतील दारुची कहाणी ऐकवली.
या महिला सांगत होत्या, यावर्षी शिमगोत्सवादरम्यान काही मंडळीनी पहिली, दुसरीतील मुलाला शीतपेयातून दारु पाजली. घरी येऊन काही मुले बेशुद्ध पडली. काहींना चक्कर येत होती. काहींनी उलट्या केल्या. त्यावेळी समजले मुले गावठी पिवून आली आहेत. परिक्षा संपल्यावर गावातील शाळकरी मुलांनी पार्टी ठरवली. मोठ्याप्रमाणे अड्ड्यावर जावून दारुही आणली. Stop illegal drug trade
दारु विक्री करणारे व्यावसायिकही निदर्यपणे आपल्या धंद्यासाठी लहान मुलांना दारु विकतात. पोलीसांकडे तक्रार केली की काहीकाळ धंदा बंद करतात. त्या काळात भलताच कोणीतरी दारु विकतो. हे सगळे थांबले नाही तर पिढी बर्बाद होईल. आमच्या घरात संघर्ष पेटेल. आमचे संसार उघड्यावर येतील. तेव्हा काहीही करा पण गावातून दारु, माडी हद्दपार करा. अशी मागणी या महिलांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सौ. अभिलाशा गुढेकर उपसरपंच धोपावे, सौ. सुनिता जाधव, श्रीमती दर्शना पावस्कर ग्रामपंचात सदस्या, सौ. अपुर्वा संसारे, सौ. विनिता गुढेकर, सौ. संजीवनी गुडेकर, सौ. आशिकी जाधव, श्रीमती मत्स्यगंधा गुढेकर, सौ. सुगंधी नाटेकर, सौ. संचिता सुर्वे आणि सौ. जोत्स्ना नाटेकर यांनी तहसीलदार व पोलीस प्रशासनाला दिले आहे. Stop illegal drug trade
