पालशेत येथे वाळू उपसा, वाहतूक करणारे वाहन पकडले
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी अवैधपणे सुरू असलेल्या वाळू व्यवसायावर गुहागर तहसीलदारांनी स्टिंग ऑपरेशन केले आहे. वाळू उपसा करून वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतल्याने अवैद्य व्यवसाय करणाऱ्या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. मात्र या कारवाईबाबत आम्हाला काही माहीत नाही असे उत्तर येथील तलाठी व सर्कल अधिकारी यांनी दिले आहे. Sting operation of Guhagar Tehsildar

गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांनी गुरुवारी रात्री अचानक पालशेत समुद्रकिनारी फेरफटका मारला. पालशेत येथे खुलेआम सुरू असलेल्या अवैद्य वाळू व्यवसायाबाबत त्यांना माहिती मिळाली होती. मात्र यावर आपले प्रशासकीय विभाग कोणतेच कारवाई करत नव्हते यामुळे त्यांनी स्वतःच या कारवाईकडे लक्ष दिले असल्याने पहिल्याच फेरीत वाळू उपसा करून वाहतूक करणारे वाहन मिळून आले आहे सदर वाहन गुहागर पोलीस परेड मैदानामध्ये आणून लावण्यात आले आहे. Sting operation of Guhagar Tehsildar
सदर वाहन पालशेत येथील कीर नामक व्यक्तीच्या नवावर असल्याचे कळते मात्र प्रत्यक्षात वेगळाच व्यक्ती त्या ठिकाणी वाळूचा अवैध व्यवसाय करत आहे. आणखी दुसरी गाडी ही कारवाई होत असल्याचे समजताच तिथून पलायन केल्याचे बोलले जात आहे. या अगोदर पालशेत येथील या अवैद्य व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर आवाज उठवणारे तेथील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्यावरही हल्ले झाल्याची घटना घडल्या आहेत. अशा या व्यवसायावर तहसीलदार परीक्षित पाटील यांनी कारवाई केल्याने या अवैध धंद्याला आळा बसेल असा विश्वास व्यक्त होत आहे. Sting operation of Guhagar Tehsildar

दरम्यान शुक्रवारी तहसीलदार मीटिंग निमित्त बाहेर गेले असल्याने दुपारी दोन वाजता पालशेतचे तलाठी निलेश पाटील यांना विचारणा केली असता या कारवाईबाबत व कोणाला आणली याबाबत आपल्याला काहीही माहित नाही. तर सर्कल अधिकारी प्रशांत कानिटकर यांच्याजवळ अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आपल्यालाही कोणाला आणली हे माहीत नसून कारवाई केले एवढेच माहित आहे. मात्र अवघ्या वीस फुटावर वाहतूक करणारे वाहन उभे असताना सर्कल अधिकारी यांना आपल्या भागातील या कारवाई बाबतची कल्पनाच नाही अशा बोलण्याने नक्की वाळू कुठे मुरते याची शंका व्यक्त होत आहे. या पकडण्यात आलेल्या अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर तहसीलदार कशा पद्धतीने कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. Sting operation of Guhagar Tehsildar