गुहागर, ता. 10 : प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने भंडारी हॉल, गुहागर येथे सुरु असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या निलांश चिपळूणकरने मुंबईच्या माजी राष्ट्रीय विजेत्या संदीप देवरूखकरला २५-१२, १६-२ असे सहज दोन सेटमध्ये हरवून स्पर्धेत खळबळ माजवली. तर महिला एकेरीच्या उप उपांत्य फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुंबईच्या उर्मिला शेंडगेवर चुरशीचा विजय मिळवला. तिने उपांत्य फेरी गाठताना उर्मिलाचा २५-१२, १०-२० व २५-१२ असा पराभव केला. स्पर्धेतील इतर निकाल पुढील प्रमाणे. State Ranking Carrom Competition
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे.
आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि ममता कुमारी ( मुंबई ) २५-१३, २५-९
सोनाली कुमारी ( मुंबई ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) २५-८, २४-६
रिंकी कुमारी ( मुंबई ) वि वि चैताली सुवारे ( ठाणे ) १८-१, २५-१२
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.
सागर वाघमारे ( पुणे ) वि वि अभिषेक चव्हाण ( रत्नागिरी ) १९-१, २३-१३
विकास धारिया ( मुंबई ) वि वि संजय मांडे ( मुंबई ) २५-१२, २५-१४
पंकज पवार ( ठाणे ) वि वि राजेश गोहिल ( रायगड ) १८-५, २३-१८
