गुहागरातील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न
गुहागर, ता. 11 : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ व वधु-वर मंडळ समितीतर्फे तेली ज्ञाती वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार दि. २४ रोजी सकाळी ९.३० वा. शुभगंध मंगल कार्यालय, मु.पो. लोवले संगमेश्वर येथे घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने पदाधिकाऱ्यांनी गुहागर तालुक्याला भेट देवून येथील तेलीसमाज पदाधिकारी, युवक संघटना, महिला संघटना यांच्यासमवेत विश्वनाथ रहाटे यांच्या निवासस्थानी नियोजन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वधुवर पालक परिचय मेळाव्याची माहिती देण्यात आली. State level Teli known brides-to-be meet
यावेळी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी सांगितले की, तेली समाजात मुलींची कमतरता असून बहुतांश मुली उच्चशिक्षित असल्याने लग्ने जुळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तरी मेळाव्यात कमी शिक्षित मुला-मुलीनी आपली नावे नोंदवावीत ही अपेक्षा व्यक्त केली. वधु-वरांचे पालक आपल्या मुलांचे विवाह योग्य वेळी व त्यांना अनुरूप जोडीदाराशी व्हावे, ही अपेक्षा बाळगुन प्रयत्न करत असतात. वधुवरांना त्यांच्या अपेक्षानुसार जोडीदार मिळावा, याकरिता वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संस्थेकडुन प्रयत्न सुरू असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन तेथील तालुका कार्यकारणी युवक संघटना व महिला संघटना यांना वधू वर परिचय मेळाव्याची माहिती देण्यात येत आहे. या वधु वर परिचय मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने वधू-वरांचे नोंदणी होईल यासाठी आमचा प्रत्येक तालुक्यात संपर्क सुरू आहे. संघाकडुन गेली १८ वर्षे वधुवर पालक परिचय मेळावे घेण्यात येत आहेत. या वधुवर परिचय पुस्तिकेसाठी आपल्या व्यावसायाची, संस्थेची व वैयक्तिक जाहीरात देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळीं अनेक समाजबांधवानी आपापली मते मांडली. त्याला संघाच्या पदाधिकाऱ्यानी समर्पक उत्तरे दिली. यावेळीं वधुवर नोंदणी नमुना फॉर्मचे वाटप करण्यात आले. State level Teli known brides-to-be meet
या बैठकीला रत्नागिरी जिल्हा तेली समाज संघटना अध्यक्ष रघुवीर शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष दिपक राऊत, विभागीय सचिव चंद्रकांत झगडे, कोकण विभाग महिला अध्यक्षा प्रियंका भोपाळकर, रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्ष श्रेया महाडीक, वधु वर मंडळ अध्यक्ष व संगमेश्वर तालुका तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष संतोष पावस्कर, जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर, रत्नागिरी शहराध्यक्ष अमोल लांजेकर, गुहागर तेली समाज अध्यक्ष प्रकाश झगडे, सचिव प्रविण रहाटे, सहसचिव गणेश किर्वे, खजिनदार विश्वनाथ रहाटे, माजी अध्यक्ष शशिकांत पवार, महिला ता.अध्यक्ष दिव्या किर्वे, जिल्हा वधु वर मंडळ सदस्य गोपाळ झगडे, माजी युवक अध्यक्ष प्रीतम रहाटे, वैभव रहाटे, रोहिणी रहाटे, अस्मिता झगडे, दीपक किर्वे, प्रतीक्षा किर्वे, सुरेश महाडिक, विष्णू महाडिक, प्रशांत रहाटे, सचिन झगडे, प्रदीप पवार, प्रभाकर रहाटे, रवींद्र झगडे, राजेंद्र राऊत, शैलेश किर्वे, प्रदीप किर्वे, समाधान रहाटे, सुहास रहाटे आदीसह कार्यकारिणी सदस्य, युवक व महिला संघटना पदाधिकारी, उपस्थित होते. State level Teli known brides-to-be meet