राज्य नाट्य स्पर्धा : भिष्म हृदविकाराने घायाळ, नितीन जोशी साकारली भुमिका
(अमेय धोपटकर यांच्या पोस्टवरुन साभार)
गुहागर, दि.15 : रत्नागिरी येथे सध्या राज्य नाट्य स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत 14 मार्चला संगीत मत्स्यगंधा या संस्थेचे नाटक सुरु होते. दुसऱ्या अंकानंतर नाटकात भिष्माचे काम करणारे कलाकार बाळु पुराणिक यांची तब्येत बिघडली. आता नाटक कसे होणार असा प्रश्र्न सर्वांसमोर होता. मात्र नाटक पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमधील नितीन जोशी (रा. वरवडे) यांनी भिष्म साकारण्यास होकार दिला. परिक्षकांची संमती मिळाली. आणि रंगदेवतेची पूजा घडावी त्याप्रमाणे नितीनजींनी भिष्माची उत्कृष्ट भूमिका साकारली. नाटक संपल्यावर अनेकांनी नितीनजींच्या धाडसाचे कौतूक केले. दरम्यान बाळु पुराणिक यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचे वृत्त आहे. State Drama Competition


रत्नागिरीमध्ये सुरु असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सोमवारी (ता. 14) सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट या नाट्य संस्थेचा प्रयोग होता. त्यांनी कै. वसंत कानिटकर लिखित संगीत मत्स्यगंधा हे नाटक बसविले होते. पहिला आणि दुसरा अंक उत्तम झाला होता. कलाकार जीव ओतून काम करत होते. आता तिसऱ्या अंकात आणखी जीव ओतून काम करायच अशा तयारीत सर्व होते. पण अचानक भिष्माची भुमिका करणाऱ्या बाळु पुराणीकांची तब्येत बिघडली. रसिक प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या डॉ. श्रीम. जोशी यांनी तपासले आणि लवकरात लवकर रुग्णालयात हलविण्याची सूचना केली. State Drama Competition
नाटक स्पर्धेतील होतं यापेक्षाही एका अर्थाने रंगभुमीची पूजा सुरु होती. आपला एक सहकारी सोबत नसताना ही पुजा सुरु कशी ठेवायची हा प्रश्र्नच सर्वांसमोर होता. परिक्षकांनी शंतनुचे काम करणाऱ्या कलाकाराने भिष्मांचे संवाद संहिता पाहून म्हणण्यास परवानगी दिली. State Drama Competition
पण रंगभुमीला ते मान्य नव्हते. नाटक पहाण्यासाठी आलेले रत्नागिरीतील नाट्य कलाकार अभयची मुळ्ये क्षितिज इव्हेंटच्या कलाकारांना भेटले. मुळ्येंनी त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला. हे नाटक पहाण्यासाठी वरवडे येथील नितीन जोशी हे नाट्यकलाकार उपस्थित आहेत. त्यांनी यापूर्वी भिष्माची भूमिका उत्तम प्रकारे केली होती. आपण त्यांना विनंती करुया का. State Drama Competition
त्यांनी नाटक नेले तारुन
रंगभुमीशी कलाकाराचं वेगळं नातं असतं. कोकणातील कलाकार तर नाटक आणि रंगभुमीवर जीवापाड प्रेम करतात. त्याचाच अनुभव पुन्हा एकदा आला. नितीन जोशींनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. रंगभुमीला विनम्र अभिवादन करुन नितीन जोशींनी भिष्माची भूमिका उत्कृष्टपणे वठवली. सावंतवाडीतील कलाकारांना बाळु पुराणिकांची उणिव कुठेही भासु दिली नाही. State Drama Competition
तिसरा अंक संपल्यावर पुन्हा पडदा वर गेला
नाट्य स्पर्धेच्या परंपरेत न होणारा चौथा अंकही रसिक प्रेक्षकांनी अनुभवला. स्पर्धेतील नाटक संपल्यावर परिक्षक मुकुंद मराठे आणि त्यांचे सहकारी बॅकस्टेजला गेले. आयोजकांना पुन्हा पडदा उघडण्यास सांगितला. नितीन जोशी आणि क्षितिज इव्हेंटच्या कलाकारांना रंगभुमीवर बोलावले. आणि सर्वांचे अभिनंदन केले. State Drama Competition
रंगभुमीची जाणिव असणारे नितीन जोशी
संगीत मत्स्यगंधा हे नाटक पुन्हा एकदा 16 मार्चला राज्य नाट्य स्पर्धेत कलारंग नाट्यप्रतिष्ठान, वरवडे खंडाळा ही संस्था सादर करणार आहे. आणि या नाटकाचे दिग्दर्शक आहेत नितीन जोशी. त्यांनी आठ वर्षांपूर्वी याच नाटकाचे 10 प्रयोग केले आहेत. शिवाय पितामह भिष्मांच्या आयुष्यावर लिहिलेल्या कुरुमणी या नाटकाचे दिग्दर्शनही केले आहे. त्यातील भीष्मांच्या भूमिकेकरीता त्यांना रौप्य पदकही मिळाले आहे. State Drama Competition

