दिवाळीत १० टक्के भाडेवाढीचा एसटी महामंडळाचा निर्णय
मुंबई, ता. 01 : सध्या दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांत नोकरी, कामासाठी आलेले चाकरमानी दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या गावी जातात. दिवाळीच्या काळात लहान मुलांच्या शाळेलाही सुट्टी असते. त्यामुळे याच काळात काही कुटुंब फिरायला जाण्याचाही प्लॅन करतात. दरम्यान, आता याच सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आता एसटीने प्रवास करणे महागणार आहे. ST travel will be expensive
मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही भाडेवाड येत्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळासाठी लागू असेल. घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्वच बसेससाठी लागू होणार नाही. शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडून इतर बसेससाठी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ST travel will be expensive

बसमध्ये बसण्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडते. या काळात लोकांनी आपापल्या इप्सित स्थळी पोहोचावे यासाठी एसटी महामंडळ पूर्ण ताकदीने काम करते. याच काळात एसटी महामंडळाच्या महसुलात मोठी वाढ होते. त्यामुळे प्रवाशांचा वाढणारा ओघ लक्षात घेता एसटी महामंडळाच्या तिजोरीत वाढ व्हावी. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा मुद्दा महामंडळासाठी कायमच मोठी अडचण ठरलेला आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करतात, असा दावा केला जातो. त्यामुळे अशी भाडेवाढ करून महसूल वाढवण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाचा आहे. या भाडेवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे. ST travel will be expensive
