ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला कात्री
मुंबई, ता. 04 : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार एसटी महामंडळाने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ST hiked the fare by 10 percent
ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल. तसेच, ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांच्या तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. एसटी ताफ्यातील १४ हजार बस प्रवासी सेवेत धावत आहेत. शिवनेरी, ई-शिवनेरी, शिवाई, अश्वमेध, परिवर्तन (लालपरी), हिरकणी, शितल, विना वातानुकूलित शयनयान, विना वातानुकूलित आसनी व शयनयान अशा सर्व बसश्रेणींसाठी भाडेवाढीनूसार तिकीट आकारण्यात येणार आहे. ST hiked the fare by 10 percent
दिवाळी हंगामाचा फायदा उठविण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळ अशा प्रकारची भाडेवाढ करीत असते. अशा प्रकारची भाडेवाढ करण्याची एसटीला मूभा देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही उन्हाळी अथवा दिवाळी सुट्यानिमित्त एसटी महामंडळाची अशा प्रकारचे दरवाढ करीत असते. एसटी महामंडळाला कोरोनाकाळात मोठा आर्थिक फटका बसला. त्यातच लांबलेला कामगारांचा संप यामुळे एसटीचे काम आणखीनच गर्तेत अडकले. एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास सवलत जाहीर केल्याने एसटीचे प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ हळूहळू आर्थिक गर्तेतून बाहेर पडत आहे. ST hiked the fare by 10 percent