सुदैवाने जिवितहानी नाही
गुहागर, ता. 23 : आज सकाळी गुहागर आगारातून सकाळची 6:30 वा. सुटणारी पांगारी हवेली गुहागर बस गुहागर तालुक्यातील खरेकोंड येथे वाहनाला साईड देताना रस्त्याच्या साईडला घसरल्याची माहिती मिळाली आहे. या बसमध्ये कॉलेजला येणारे विद्यार्थी तसेच 40 ते 45 प्रवासी होते. सुदैवाने सर्व सुखरूप आहेत. ST bus skidded while giving way to a vehicle

गेले दोन-तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते निमुळते झाले आहेत. साईड पट्ट्या खचलेल्या आहेत. त्यामुळे अनेक अपघात घडत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ST bus skidded while giving way to a vehicle