• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ऋण फिटता फिटेना

by Mayuresh Patnakar
February 23, 2022
in Guhagar
18 0
0
SSC 1995 Batch Students visit School

SSC 1995 Batch Students visit School

35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

SSC 1995 Batch Students visit School

सौ. प्राजक्ता जोशी

गुहागर, दि. 23 :  माणूस कितीही मोठा झाला, यशस्वी झाला तरी त्याला घडविण्यात अनेकांचा हातभार असतो. आईवडील, मित्रमंडळी, कुटुंब, समाज यासोबत अजून एक महत्वाचा घटक व्यक्तीच्या जडणघडणीत महत्वाचा असतो तो म्हणजे त्याची शाळा आणि शिक्षक. SSC 1995 Batch Students visit School

शाळेत जोपासलेली मैत्री ही आयुष्यभराचा ठेवा असते ही भावना जपत, २०१४ साली श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर च्या १९९५ च्या १० वी च्या बॅच चे ‘१० अ ‘ चे विद्यार्थी जवळ जवळ 20 वर्षांनी एकत्र आले. ही प्रथम पुनर्भेट अर्थातच शाळेत आयोजित करण्यात आली होती. त्या वर्गाला शिकविणारे शिक्षक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या भेटीदरम्यान आपण आपल्या शाळेसाठी  काहीतरी केले पाहिजे अशी भावना प्रत्येकाने बोलून दाखविली. त्यानंतर शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांना विचारून, गरजेनुसार शाळेला साऊंड सिस्टीम ची गरज असल्याचे समजले. प्रत्येक वर्गात कनेक्शन मिळून संपूर्ण सिस्टिम चा खर्च लाखाच्या घरात जाणार होता. १० वी अ १९९५ ने मनावर घेऊन  प्रत्येकाला शक्य होईल ती रक्कम सर्वांनी या कामासाठी दिली आणि काही इतर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पण थोडी मदत करून  एक लाख वीस हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टीम शाळेत बसवली गेली! पण ही तर फक्त सुरुवात होती. SSC 1995 Batch Students visit School

त्यानंतर प्रत्येक वर्षी ही मंडळी वर्षातून एकदा भेटतात. त्यावेळीही शाळेसाठी अजून काय करता येईल का याचा विचार होतोच. त्यातूनच शाळेत आवश्यक असणारी अजून एक गोष्ट म्हणजे विविध महापुरुषांच्या तसबिरी ही एक नवीन गरज पुढे आली. गृप मध्ये  विषय मांडल्यावर काहींनी लगेच आपण आर्थिक भार उचलण्याची तयारी दाखवली. कोणत्या फोटो फ्रेम आवश्यक आहेत याची शाळेतून यादी घेऊन खर्चाचा अंदाज घेऊन लगेच गुहागरला स्थायिक असणारे वर्गबंधू कामाला लागले व त्यातूनच वेगवेगळ्या २५ व्यक्तींच्या तसबिरी व्यवस्थित फ्रेम करून शाळेतील एका वर्गात भिंतीवर बसवून देण्यात आल्या. यासाठी सुमारे वीस हजार रुपये खर्च आला. SSC 1995 Batch Students visit School

SSC 1995 Batch Students visit School
SSC 1995 Batch Students visit School

त्या निमित्ताने सोमवार दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी शाळेत एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वाना उपस्थित रहाणे शक्य नसले तरी गुहागर व जवळपास राहणाऱ्या १० वी अ १९९५ च्या काही माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या छोटेखानी कार्यक्रमासाठी शाळेतील सध्याचे विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कृपाल परचुरेसर यांनी केले.  मुख्याध्यापक मा. श्री. आडेकरसर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. SSC 1995 Batch Students visit School

उपमुख्याध्यापक श्री.कांबळेसर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी विद्यार्थ्यांपैकी श्री मंदार गाडगीळ, श्री केदार परचुरे आणि श्री मंदार कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मातृऋण, पितृऋण आणि गुरूऋण अशी तीन प्रकारची ऋण असतात त्यातील गुरू म्हणजेच शाळेचे ऋण आपण सर्वांनी फेडले पाहिजे ,तसेच शालेय जीवनातील मैत्रीचा ठेवा आपण कायम जपला पाहिजे अशी भावना मंदार गाडगीळ यांनी व्यक्त केली. गुरूंचे मिळणारे मार्गदर्शन आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेते असे विचार मंदार कानडे यांनी मांडले. केदार परचुरे यांनी आपल्या शाळेचे तालुक्यातील महत्व, पूर्वी कष्ट घेऊन, माधुकरी मागून शिकणारे, लांबून चालत शाळेत येणारे, असे विद्यार्थी आणि आताच्या काळातील सर्व सोयी उपलब्ध असतानाचे विद्यार्थी यातील फरक स्पष्ट करतानाच, सोशल मीडिया, त्यावरील प्रत्येक वर्गाचे गृप, शाळेला असणाऱ्या गरजा त्या गृप मार्फत माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, शक्य ती मदत सर्वांनी करणे यावर  आपल्या मनोगतात भर दिला. यांच्याशिवाय माधविका वराडकर, अद्वैत जोशी, सुभाष सोलकर, प्रशांत कानडे, योगेश बेंडल, दीपक माटल, रुपेश गोयथळे हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. एकूणच विद्यार्थी जरी शिकून शाळेबाहेर गेला तरी त्याने आपले शाळेसोबत असणारे नाते जपणे गरजेचे आहे हे सर्वांच्या बोलण्यातून प्रतीत झाले. शेवटी श्री गोयथळे सर यांनी सर्वांचे आभार मानले. SSC 1995 Batch Students visit School

विद्यार्थ्यांना शाळेचे ऋण समजावे, त्यांनी देखील यशाच्या पायऱ्या चढताना पहिल्या पायरीकडे म्हणजे शाळेकडे लक्ष द्यावे या उद्देशाने हा कार्यक्रम सध्याच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत  घेण्यात आला. १९९५ बॅच च्या बऱ्याच विद्यार्थिनी उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यातील वैभवी जोगळेकर, योगिनी निगुडकर, शीतल मोडक, प्रीती कनगुटकर, अनामिका विखरे, अंजली साटले, प्राजक्ता जोशी, संतोषी मर्दा यांनी मेसेज व दूरध्वनीवर आपल्या शाळेप्रति सदिच्छा व्यक्त केल्या. SSC 1995 Batch Students visit School

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSSC 1995 Batch Students visit Schoolटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.