दररोज लकी ड्रॉद्वारे एक ग्रॅम सोने; दसऱ्याच्या दिवशी महिलांसाठी लकी ड्रॉने एक तोळ्याचे मंगळसूत्र
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २४ आक्टोबर या कालावधीत नवरात्री उत्सवानिमित्त दांडिया रास आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री गणेश कृपा ज्वेलर्स शृंगारतळीचे मालक जय शरद गुहागरकर यांच्या वतीने दांडिया प्रेमींसाठी दररोज लकी ड्रॉ द्वारे एक ग्रॅम सोने तर दसऱ्याच्या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लकी ड्रॉ द्वारे एक तोळ्याचे मंगळसूत्र देण्यात येणार आहे. Sringaratali Navratri festival


रविवार दि.१५ रोजी सकाळी श्री शारदा देवीची स्थापना करण्यात येणार आहे. १५ ते २४ ऑक्टोबर रोजी दररोज दांडीया रास, दि. १६ ते १८ आक्टोबर रोजी टीडब्लूजे प्रस्तुत भावार्थ ग्रंथप्रदर्शन, मंगळवार दि. १७ रोजी टीडब्लुजे कंपनीच्या वतीने सकाळी १० ते साय. ५ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबीर, शनिवार दि.२१ रोजी रात्री रेकॉर्ड डान्स स्पर्धा, सोमवार दि.२३ रोजी रात्री फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मंगळवार दि. २४ रोजी रात्री बक्षिस वितरण समारंभ, तसेच रविवार दि. १५ ते २३ रोजी श्री गणेश कृपा ज्वेलर्स शृंगारतळीचे मालक जय शरद गुहागरकर यांच्या वतीने दांडिया प्रेमींसाठी दररोज लकी ड्रॉ द्वारे एक ग्रॅम सोने तसेच मंगळवार दि. २४ रोजीदसऱ्याच्या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लकी ड्रॉ द्वारे एक तोळ्याचे मंगळसूत्र देण्यात येणार आहे. तसेच बुधवार दि २५ रोजी सायं. ४ वा. श्री शारदादेवीचे विसर्जन गुहागर समुद्र येथे होणार आहे. Sringaratali Navratri festival
तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मनोज (बापू) कोळवणकर, उपाध्यक्ष जय (दादू) गुहागरकर, उत्सव समिती अध्यक्ष विक्रांत नारकर, उत्सव समिती उपाध्यक्ष सुमित नांदलस्कर, सदस्य गौरव वेल्हाळ यांनी केले आहे. Sringaratali Navratri festival