गुहागर, ता. 28 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (KDB) इतिहास विभागातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. Social Justice Day

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सौ. रश्मी आडेकर यांनी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्यायदिवस’ म्हणून महाराष्ट्र शासन २००३ पासून हा दिवस साजरा करत असल्याचे सांगितले. याचे स्पष्टीकरण करताना राज्यघटनेच्या सरनाम्यात असलेली सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व विश्वास यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची सामानता ही उद्दिष्टे ही शाहूमहाराजांनी आपल्या कारभारात प्रत्यक्षात आचरणात आणून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे. हा विचार पुन्हा रुजावा व पुढे चालू राहावा. यासाठी जयंतीचे प्रयोजन असल्याचे सांगितले .विद्यार्थी मनोगतामध्ये कु. दिप्ती महाजन हिने शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेला परदेशी प्रवासातील एक किस्सा सांगितला. Social Justice Day

या कार्यक्रमाचा समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाहू महाराज्यांनी विधवा स्त्रियांसाठी केलेल्या कार्यावर प्रामुख्याने भाष्य करताना आजच्या काळात सुद्धा या बाबतीत लोकांच्या मनात जी संकुचित भावना आहे याबद्दल खेद व्यक्त केला. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. यामध्ये शाहू महाराजांचे योगदान असल्याचे स्पष्ट केले. छ. शाहू महाराजांच्या योगदानाबद्दल कानपूरच्या कुर्मी समाजाने ‘राजर्षी’ ही पदवी देऊन गौरव केला. व शाहू महाराजांच्या विचारांवर फलक लेखन करण्यात आले आहे. शेवटी सौ. आडेकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. Social Justice Day
