गुहागरातील शिवजयंती मिरवणुकीत सहभाग; शिवरथ बनविला मुस्लिम बांधवाने
गुहागर, दि. 22 : वर्षात येणारे सण एकत्रितपणे साजरे करण्याची परंपरा तालुक्यातील हिंदू- मुस्लीम समाजाने जपली आहे. त्याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवात सर्वांना पहावयास मिळाले. महाराजांसाठी तयार करण्यात आलेला शिवरथ हा मुस्लिम समाजातील बांधवाने केला होता. तसेच शृंगारतळी मध्ये शिवरथाचे स्वागत करताना शिवप्रेमींना पाणी, थंडपेये, बिस्किटे वाटत मिरवणुकीत सहभाग नोंदवला. Social commitment the Muslim community

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम शीवभक्त गुहागरवासीय यांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शिव पादुकांच्या रथाची शृंगारतळी ते अंजनवेल येथील किल्ले गोपाळगडावर रॅली काढण्यात आली. असंख नागरिकांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून रॅली काढण्यात आली. Social commitment the Muslim community

या रॅलीसाठी शृंगारतळी मधील मुस्लिम समाजातील फर्निचर व्यावसायिक एजाज शेख यांनी शिवरथ तयार केला. त्यांना हे शिवरथ बनविण्यासाठी तब्बल 9 तास लागले. गेली 19 वर्षे ते याठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत. छ. शिवाजी महाराजांचे रथ तयार करणणे हे माझे भाग्य समजतो असे ते म्हणाले. शिवरथ तयार करण्याची संकल्पना ही शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी, अजय खाडे, मुन्ना जैतपाल यांची होती. एजाज शेख यांनी बनवलेला शिवरथ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. Social commitment the Muslim community

तसेच मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार मेमन व जमातुल मुस्लिमीन कमिटीचे सेक्रेटरी अब्दुल रज़्ज़ाक घारे यांनी आपल्या कमिटी सदस्यांच्या माध्यमातून शृंगारतळी बाजारपेठेत शिवरथा मधील शिवपादुकांना पुष्पहार घालून मिरवणुकीतील शिवप्रेमींना गळाभेट करून त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर रॅलीमधील शिवप्रेमींना पाणी, थंडपेये, बिस्किटे यांचे वाटप केले. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी सुद्धा चिखली ते शृंगारतळी येथील निळकंठेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी रॅलीतही मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शिवाय गुहागर वरचापाट मुस्लिम मोहल्ल्यातील बांधवांनीहि रॅलीचे पुष्पवृष्टीने स्वागत करून शिवप्रेमींना खाऊ वाटप केले. तर काही मुस्लिम बांधव रॅली सोबत गोपाळगड किल्ल्यापर्यंत येऊन हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. Social commitment the Muslim community

