• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सर्पदंशामुळे महिलेचा मृत्यू

by Ganesh Dhanawade
July 20, 2022
in Guhagar
16 0
0
snakebite

snakebite (Filed image)

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील मुंढर वळवणवाडी येथे शेतीचे काम करणाऱ्या महिलेला विषारी साप चावून snakebite दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. पोलिसांनी तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर घटनेचा पंचनामा केला.

तालुक्यातील मुंढर वळवणवाडी येथील शेतकरी महिला प्रभावती प्रकाश मोहित (वय 59) या आपल्या घराशेजारी असणाऱ्या शेतामध्ये गवत काढत होत्या. यावेळी गवतात असलेल्या सापवर पाय पडल्याने सापने पायाला दंश केला. snakebite आपल्याला सापाने दंश केल्याचे लक्षात येताच प्रभावती मोहित यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र आजूबाजूला कोणीच नव्हते.  वेदनांमुळे नेमका कोणता साप चावला ते शोधण्याचा प्रभावतींनी प्रयत्न केला नाही. तातडीने घरी गाठून त्यांनी शेजाऱ्यांना साप चावल्याचे सांगितले. मुंढर वळवणवाडी येथे तत्काळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने आजुबाजुच्या ग्रामस्थांनी प्रभावती मोहित यांना रुग्णालयात घेवून जाण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. परंतू वेळेवर वाहन मिळाले नाही. वाहन मिळताच ग्रामस्थांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली येथे उपचारासाठी नेले. वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच सदर महिलेचा वाहनामध्येच मृत्यू झाला होता. तळवली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी ग्रामस्थांना सांगितले. snakebite
सदर महिलेला सर्प किंवा कांडर जातीचा साप चावला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मयत प्रभावती मोहित या गावी राहत होत्या. त्यांना दोन मुलगे व दोन मुली आहेत. snakebite

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarsnakebiteटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.