गुहागर तालुक्याची सुकन्या ; बारावी शास्त्र शाखेत मिळविले ९४.८३ टक्के गुण
गुहागर दि. 09 : तालुक्यातील शृंगारतळी येथील कु. सिमरन संजय नागवेकर या गुहागरच्या सुकन्येने चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स शाहूपुरी, कोल्हापूर या महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेमध्ये ९४.८३ टक्के संपादन करून द्वितीय क्रमांक मिळवला. चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन कोल्हापूर हायेस्ट सक्सेश रँकमध्ये मुलींमध्ये प्रथम तर् चाटे ग्रुप ऑल महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. Simran tops among girls in the state
माध्यमिक शालांत (इयत्ता दहावीच्या ) परीक्षेमध्ये कु. सिमरन संजय नागवेकर हिने ९८.४० टक्के गुण मिळवून गुहागर हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक तर गुहागर तालुक्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला होता. Simran tops among girls in the state
कु.सिमरन हिचे मूळगाव संगमेश्वर तालुक्यातील कडवई हे असून गेले अनेक वर्ष शृंगारतळी या ठिकाणी तिचे वास्तव्य आहे. हिने नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान विभागात चाटे ग्रुप ऑल महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम क्रमांक, चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स शाहूपुरी कोल्हापूर या महाविद्यालयात द्वितीय क्रमांक व चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन कोल्हापूर हायेस्ट सक्सेश रँकनुसार मुलींमध्ये प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Simran tops among girls in the state