संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 18 : सुयश कंप्यूटर्स सेंटर आबलोली येथे MSCIT अभ्यासक्रमाच्या २५ वर्षांच्या यशस्वी पूर्तीनिमित्त (रौप्यमहोत्सवी निमित्त) एक विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी MS- CIT उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी आणि सध्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले नवीन विद्यार्थी, गुहागर तालुक्यातील काजुर्ली येथील कै.डॉ.दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली या विद्यालयाचे विद्यार्थी यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. Silver Jubilee Celebration at Suyash Computer Center

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सुयश कंप्यूटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आणि MS- CIT अभ्यासक्रमाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीबद्दल सविस्तर माहिती दिली. हा प्रवास कसा होता आणि त्यात संस्थेचे योगदान कसे राहिले, यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर, ‘Why MS-CIT’ संदेश साळवी यांनी ‘Why MS-CIT’ (MS-CIT का करावे?) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक प्रभावी सादरीकरण (presentation) केले. अभ्यासक्रम आणि AI चे महत्त्व, MS-CIT च्या अद्ययावत अभ्यासक्रमाची माहिती दिली. यामध्ये आधीच्या MS-CIT चा अभ्यासक्रम आणि सध्याचा MS-CIT चा अभ्यासक्रमात आलेले १०० AI TOOLS, हा झालेला अमुलाग्र बदल याची माहिती दिली. भविष्यातील तंत्रज्ञान असलेल्या AI (Artificial Intelligence) चे महत्त्व आणि MS-CIT अभ्यासक्रमात त्याचा कसा समावेश होत आहे, याबद्दल त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच MS-CIT REFRESH COURSE बद्दल माहिती दिली. महाराष्ट्र ऑल्म्पियाड मुव्हमेंट परिक्षेबाबतही मार्गदर्शन केले. Silver Jubilee Celebration at Suyash Computer Center

सर्व मनोगते आणि सादरीकरणानंतर, MS-CIT च्या २५ वर्षांच्या यशस्वी पूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी केक कापण्यात आला. या क्षणी सर्व उपस्थित माजी आणि नवीन विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला. अशा प्रकारे, जुन्या आणि नवीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत, माहितीपूर्ण सादरीकरण आणि उत्साही वातावरणात हा रौप्यमहोत्सवी सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी संचालक संदेश साळवी, संचालिका सावी साळवी, शिक्षिका साक्षी सावंत, शुभम सावंत, प्रवीण आचरेकर, सिद्धी डिंगणकर, पल्लवी पराग, महाडिक मॅडम उपस्थित होत्या. Silver Jubilee Celebration at Suyash Computer Center
